fbpx

…म्हणून भडकलेल्या मुनगंटीवारांनी दिला ‘ओबीसी जिंदाबाद’चा नारा

टीम महाराष्ट्र देशा- देवेंद्र फडणवीस सरकारचा निवडणुकीपूर्वीचा अखेरचा अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत सादर करत आहेत.आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमी लक्षात घेता सरकारसाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. त्यामुळेच या अर्थसंकल्पात काही लोकप्रिय घोषणा केल्या यावेळी मुनगंटीवार यांनी ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या वस्तिगृहासंदर्भात तरतूद वाचून दाखवताना सभागृहात गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

विरोधकांनी चालवलेला गोधळ पाहून मुनगंटीवार यांचा चांगलाच पार चढला. यावेळी मुनगंटीवार यांनी ओबीसी जिंदाबाद! हा नारा दिला. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, असे सांगत त्यांनी इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मुले आणि मुली वेगवेगळ्या गटात ३६ वस्तिगृहाची तरतूद करण्यात आल्याची माहिती दिली.पुढे मुनगंटीवार म्हणाले की, विरोधक नेहमीच ओबीसी आणि धनगर समाजासंदर्भातील मुद्यांवर विरोध दर्शवत असतात. हा तांत्रिक विरोध नाही. विरोधकांना देवसुद्धा सदबुद्धी देऊ शकत नाही.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सरकारने केलेल्या घोषणा-

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मुले आणि मुली वेगवेगळ्या गटात ३६ वस्तिगृहाची तरतूद

त्यांनी क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या नावाने इतर मागासवर्गीय विद्यार्थीनींसाठी शिष्यवृत्ती देणार

५ वी ते ७ वीच्या विद्यार्थीनींना प्रतिमहा ६० रुपये तर ७ वी ते १० वीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींसाठी प्रति महा १०० रुपये शिष्यवृत्ती मिळणार

राज्यातील जवळपास २ लाख २० हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल