सुधीर मुंनगंटीवारांनी घेतली आमदारकीची शपथ !

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीनंतर रंगलेल्या सत्ता संघर्षा मुळे आमदारांच्या शपथविधीला दिरंगाई झाली होती. मात्र हीचं दिरंगाई भाजप आमदार सुधीर मुंनगंटीवार यांच्या वाट्याला जास्त काळ आली होती. आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सुधीर मुंनगंटीवार यांना सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ दिली आहे.

घरगुती कार्यक्रम असल्याने सुधीर मुंनगंटीवार आमदार शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यामुळे आज त्यांना शपथ देण्यात आली. मुलगी शलाकाचे लग्न असल्यामुळे सुधीर मुनगंटीवार हे काही काळ राजकारणापासून लांब दिसले. मुलीच्या लग्नात आपल्या पत्नीसोबत त्यांनी संगीतमध्ये सहभागी होत नृत्याचा आनंद घेतला होता.

दरम्यान सत्ता संघर्षाच्या काळात सुधीर मुंनगंटीवार यांनी चांगलीचं भूमिका बजावली होती. भाजपची बाजू लावून धरत त्यांनी शिवसेनेच्या प्रश्नांना उत्तर दिली होती. तसेच फडणवीस यांच्या सरकारच्या काळात सुधीर मुंनगंटीवार यांनी राज्याचे अर्थखात्याची जबाबदारी सांभाळली होती. मात्र आता महाविकासआघाडीचे सरकार आल्याने सुधीर मुंनगंटीवार यांना विरोधी बाकावर बसावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या