fbpx

आम्ही देखील  वेगवेगळे लढण्यास तयार आहोत, मुनगंटीवारांनी सेनेला डिवचले 

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा- आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये युती करायची की नाही, याचा निर्णय आता शिवसेनेने घ्यायचा आहे. युती झाली तर एकत्र निवडणूक लढविली जाईल, नाही झाली तर वेगवेगळे लढण्यास तयार आहोत,’ अशी स्पष्ट भूमिका राज्याचे वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केली. वृक्ष लागवड कार्यक्रमासंदर्भात आयोजित बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेबरोबर युती करण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर मुनगंटीवार यांनी हे वक्तव्य केले.

नेमकं काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार  ?

‘भाजप आणि शिवसेना यांचा विचार एक असल्याने राज्याची काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसपासून सुटका करता आली. दोन्ही काँग्रेसने जनतेचा सूड घेण्याचा एककलमी कार्यक्रम पंधरा वर्षे केला. पुन्हा त्यांच्या हाती राज्य जाऊ नये, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे युती व्हावी, असे वाटते.’ ‘युतीसंदर्भात शिवसेनेशी अनेकदा बोलणी झाली आहे. युती करायची की नाही, याबाबतचा निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे. ही जबाबदारी शिवसेनेची आहे, भाजपची नाही. शिवसेना बरोबर आली, तर एकत्र लढू. नाही आली तर एकटे लढून राज्यात पुन्हा विजय मिळवू,’