बापटसाहेब तुमचा स्वत:वर भरोसा नाय का ? सुधीरभाऊ आणि बापट यांच्यात रंगला कलगीतुरा

टीम महाराष्ट्र देशा: पुण्यात डाळिंब परिषदेत बोलताना अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी वर्षभराने सरकार बदलणार असल्याच खळबळजनक वक्तव्य करून राजकीय चर्चेंना पेव फोडला आहे. विरोधीपक्षांना तर गिरीश बापटांच्या या विधानाने आयते कोलीतच मिळाले आहे मात्र, स्वपक्षीय आमदार आणि मंत्री सुद्धा बापटांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेत आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर बापटसाहेब स्वत:वर भरोसा नाय का, असा सवालच केला आहे.

दरम्यान, सत्तेत असलो तरी पुढे काय होईल, हे सांगता येत नसल्याचे सांगत लवकर कामे मार्गी लावून घेण्याचा सल्ला गिरीश बापट यांनी दिला होता.मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुधीर मुनगंटीवार व बापट यांची भेट झाली तेव्हा सुधीरभाऊंनी बापटांना चांगलेच फैलावर घेतले.