‘मिशन राम मंदिर’ : प्रभू रामचंद्रच्या कृपेने आमच्यातील छोटे-मोठे मतभेदही दूर होतील : मुनगंटीवार

टीम महाराष्ट्र देशा- एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आपल्या मित्राने आपल्याशी स्पर्धा केली, तर त्यात गैर काहीच नसतं. राम मंदिर बांधण्याच्या हेतूने जर उद्धव ठाकरे अयोध्याला गेले असतील, तर त्यात गैर काहीच नाही. यात स्पर्धा किंवा कुरघोडीचा प्रश्नच येत नाही, असं भाजप नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. प्रभू रामचंद्रच्या कृपेने आमच्यातील छोटे-मोठे मतभेदही दूर होतील असा दावा देखील त्यांनी केला.

अयोध्येत राम मंदिर निर्माण व्हावं ही देशातल्या प्रत्येक हिंदूच्या मनातली भावना आहे. शरयूच्या काठावर आज उद्धव ठाकरे जी महाआरती करणार आहेत, त्याचा देशाचा नागरिक म्हणून मला आनंदच आहे, अशा भावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

Rohan Deshmukh

नेमकं काय म्हणाले मुनगंटीवार?

प्रभू रामचंद्रच्या कृपेने आमच्यातील छोटे-मोठे मतभेदही दूर होतील. आधी जर युतीसाठी ‘स्टेट हायवे’ होता, तर आता अयोध्याच्या निमित्ताने ‘राष्ट्रीय मार्ग’ तयार होईल. राम मंदिर हा मताचा विषय नाही, ती कोट्यवधी जनतेच्या मनाची आस्था आहे. निवडणुकीचा मुद्दा फक्त आणि फक्त विकासाचा असू शकतो. दीन-दुर्बलांना न्याय मिळावा, वंचितांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य मिळावं, हा निवडणुकीचा मुद्दा असेल. राम मंदिर हा राजकारणाचा नाही तर राष्ट्रकारणाचा मुद्दा आहे.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...