चंद्रपूर : आदिवासीबहुल चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रपतीपदाच्या एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी झालेल्या जल्लोषात आदिवासी बांधवांच्या नृत्यात भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार देखील सहजच थिरकले. भाजपच्या वतीने शहरातील मुख्य गांधी चौकात विविध आदिवासी नृत्यांच्या माध्यमातून हा विजयोत्सव साजरा झाला.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी पारंपरिक वेशभूषेच्या माध्यमातून देशाची पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती निवडून आल्याचा आनंदोत्सव सुरु केला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा करत द्रौपदी मुर्मू यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. हा क्षण देशातील जनतेच्या आत्मविश्वासात भर घालणारा असल्याचे आमदार मत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या:
- Radhakrishna patil l महाराष्ट्रातील दोन्हीही काँग्रेस फुटीच्या मार्गावर आहेत – राधाकृष्ण विखे पाटील
- Samantha prabhu | “मला आणि नागाला एका खोलीत बंद केले तर…”; समंथा रुथ प्रभू काय म्हणाली वाचा
- Aditya Thackeray : “मी उत्तरं द्यावीत एवढी गद्दारांची लायकीही नाही”; आदित्य ठाकरे आक्रमक
- Suhas Kande : आदित्य ठाकरे वाघ, पण मटण खायच्याऐवजी डाळ भात खाताहेत; सुहास कांदे यांचा पलटवार
- IND vs WI ODI : टीम इंडियाला मोठा झटका, स्टार खेळाडू जखमी; मालिकेबाहेर जाऊ शकतो
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<