Share

Sudhir Mungantiwar | शिंदेंच्या दीड वर्षांच्या नातवाबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

चंद्रपुर: 5 ऑक्टोबर रोजी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा वेगवगळ्या ठिकाणी दसरा मेळावा पार पडला. शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर होता. तर ठाकरे गटाचा शिवाजीपार्कवर होता. दोन्हीही गटांनी आपलं शक्तीप्रदर्शन दाखवलं. त्याचबरोबर दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर सडकून टीका केल्या असल्याचं पाहायला मिळालं. यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या दीड वर्षाच्या मुलावर एक वक्तव्य केलं. त्यावर आता भाजप पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला आहे.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार ?

उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरून एकनाथ शिंदे यांच्या दीड वर्षाच्या नातवाचा उल्लेख केला. हे चुकीचं आहे. कारण राजकारणामध्ये आपण कोणत्या स्तरावर गेलो, याचं विश्लेषण जनता केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना चांगलंच फटकारलं आहे. सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, विजयादशमीच्या निमित्ताने भाषण देताना विचारांचं सोनं वितरीत होईल, असं आपल्याला वाटलं होतं. पण तिथे विचारांऐवजी सत्ता गेल्याचं मनामध्ये असलेलं दु:ख, राग व्यक्त झाला. नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्याबाबत निम्न शब्दांचा वापर करता करता त्यांची सत्ता कधी गेली, हेच त्यांना कळालं नाही.

उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

दरम्यान, दसरा मेळाव्याच्या भाषणामधये बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि आता नातू नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे. त्याला मोठं तर होऊ द्या,असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या :

चंद्रपुर: 5 ऑक्टोबर रोजी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा वेगवगळ्या ठिकाणी दसरा मेळावा पार पडला. शिंदे गटाचा मेळावा बीकेसी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now