महाविकास आघाडीच्या सरकारने आदित्य ठाकरे यांच्या लग्नालाही स्थगिती दिलीये

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार हे स्थगिती सरकार आहे. या सरकारने आदित्य ठाकरे यांच्या लग्नालाही स्थगिती दिली आहे, अशी खोचक टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ठाकरे सरकारच्या काजमाफी विरोधात भाजपने राज्यभरात ठिय्या आंदोलन पुकारले आहे. मुंबईतील आझाद मैदानातही आज भाजपने सभा घेतली यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी सरकारवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार निष्क्रिय असल्याचा असून अब की बार बाप-बेटे की सरकार, अब की बार स्थगिती सरकार, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. तसेच या सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते, ते कोणतीही नशा न करता दिले होते का, असा प्रश्न पडतो. हे सरकर खोटं बोलणाऱ्यांचं आहे. त्यांना स्मरणशक्तीची गोळी द्यायला हवी. गजनी सिनेमामध्ये अमिर खान विसरायचा हे तर गजनीचे बाप आहेत. ते कधी कर्जमुक्ती करणार आहेत? असा सवलही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Loading...

त्याचप्रमाणे, राज्यातील सरकार हे स्थगिती सरकार आहे. त्यांनी मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली, तशी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या लग्नालाही स्थगिती दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणतात अयोध्येला जाणार तर त्यांचे मार्गदर्शक म्हणतात अयोध्येत मशिदीसाठी ट्रस्ट करा. सरकारमध्ये जागोजागी विसंगती असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. तसेच मागील सरकारच्या योजनांची चौकशी करण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला आव्हान दिलं. कितीशी चौकशी केली तरी, काही सापडणार नाही. मागील सरकारमध्ये शिवसेनाही सत्तेत होती, हेच ते विसरले आहेत, असंही ते म्हणाले.

 

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
एकही केस नसणाऱ्या आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा कशाला ? : निलेश राणे