VIDEO : मंत्र्यांना नव्या गाड्या दिल्याने कोरोना जाणार आहे का, मुनगंटीवारांचा पवारांना टोला

sharad pawar sudhir mungantiwar

मुंबई : अयोध्येतील श्री राम मंदिराच्या भव्य मंदिराच्या बांधकामाच्या संदर्भात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने शनिवारी एक बैठक घेतली. या बैठकीत मंदिराच्या भूमीपूजनासाठी ३ आणि ५ ऑगस्ट या दोन तारखा निश्चित करण्यात आल्या.

निश्चित केलेल्या तारखांपैकी ज्या तारखेला पंतप्रधान उपस्थित राहू शकतील त्या दिवशी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत भूमीपूजन सोहळा करण्याची योजना ट्रस्टने निश्चित केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ट्रस्टचा प्रस्ताव मिळाल्यानंतर ५ ऑगस्टला मंजुरी दिली. भूमिपूजनाचा हा कार्यक्रम ३ ते ४ तास चालेल. भूमिपूजनाच्या या कार्यक्रमासाठी काशीवरून पुजारी बोलवण्यात येणार आहेत. ५ ऑगस्टला सकाळी ८ वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे.

ठाकरे सरकारच्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

या भूमीपूजनावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. लॉकडाऊनमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील, असं शरद पवारांनी म्हटलं.

शरद पवारांच्या या विधानाचा माजी अर्थमंत्री आणि भाजप नते सुधीर मुनगंटीवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘मंदिर बांधल्याने कोरोना जाणर नाही ये देशाला माहित आहे. देशातील जनता हुशार आहे कोणाला यावर बोलायची गरज नाही. आपल्या राज्यात पहा इथं मंत्र्यांना नव्या गाड्या दिल्याने कोरोना जाणार आहे का ?, शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्याने कोरोना जाणार आहे का’? असे सवाल मुनगंटीवार यांनी पवारांना केले आहेत. तर अशा पद्धतीचे घाणरडे राजकरण आता तरी सोडायला हवं. असा टोला देखील मुनगंटीवार यांनी पवारांना लगावला आहे.

जनतेचं हे अलोट प्रेम हीच पवार साहेबांची उर्जा – सुप्रिया सुळे

पहा काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार