‘हे’ ठाकरे सरकार म्हणजे गजनीचा बाप – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना याचा निषेध भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. त्यामध्ये भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने सहभागी झाले आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर सरकार विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. फडणवीसांसह भाजपचे अनेक नेते या आंदोलनात सहभागी झालेत.

Loading...

भाजपच्या या आंदोलनावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जोरदार टीका केली आहे. ‘माजी मुख्यमंत्री व गृहमंत्री,सध्याचे विरोधी पक्षनेते कदाचित आपला गजणी झालेला दिसतोय. आपल्याच काळात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात दुसरे, अशी ओळख निर्माण झाली. २०१६ ते २०१८ या काळात ३१,१२६ घटना घडल्या हे आपण विसरू नका. आजचे आंदोलन हे तुमच्या अपयशाचा आरसा आहे. चोराच्या उलट्या बोंबा. हे तंतोतंत आपण पालन करत आहात’. असा घणाघात चाकणकर यांनी केला आहे.

यावरच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे. उद्धवजी… सरसकट कर्जमुक्तीचं वचन कधी पूर्ण करणार, असा सवाल भजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. तसेच हे सरकार तर गजनीचा बाप आहे, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. सरकार शेतकऱ्यांशी खोटं वागतंय. 17 मंत्रिमंडळ बैठकात एकही लोकोपयोगी निर्णय घेतला नाही, असं म्हणत मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं दरम्यान, सरकारला जागं करण्यासाठी हे आंदोलन आहे, सरकारच्या विरोधात जो एल्गार पुकारला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?