‘चौकशी ही एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाची नसून ती एका व्यवसायाची आहे’

टीम महाराष्ट्र देशा : कोहिनूर स्क्वेअर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. राज ठाकरे यांच्या ईडीच्या चौकशीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हाय व्होल्टेज वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, भाजपचे नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर आपली प्रतिकिया दिली आहे. राज यांची ईडीकडून होत असलेली चौकशी ही एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाची नसून ती एका व्यवसायाची, असल्याची मुनगंटीवार म्हणाले आहे . एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिकिया वेळी ते बोलत होते .

चौकशीला बोलवण्यात आले म्हणजे राजकरण आहे. असे म्हणणे योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांची ९ तास चौकशी झाली होती, त्यामुळे चौकशी झाली म्हणजे आरोपी आहेच असे होत नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले. त्यामुळे या चौकशीला राजकीय दृष्टीने पाहू नयेत असे सुद्धा मुनगंटीवार म्हणाले.

दरम्यान राज ठाकरे यांच्या चौकशीवरून विरोधाकांनी सत्ताधारी भाजपला लक्ष केले आहे. राज ठाकरे यांना ईडीची नोटीस पाठवून सरकार नीच राजकारण करत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. तर भाजप आपल्या सत्तेचा वापरकरून सरकार विरोधी नेत्यांना त्रास देत असल्याची टीका समाजमाध्यमांतून होत आहे.

महत्वाच्या बातम्या