काँग्रेस–राष्ट्रवादीच्या नेत्यांचे जनतेप्रती असलेले प्रेम ढोंगी – सुधीर मुनगंटीवार

sudhir mungantiwar

सिंधुदुर्ग  : राज्याच्या तिजोरीवर पंधरा वर्षे दरोडा घालणारे काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसवाले आता जनहिताचा कांगावा करत रस्त्यावर उतरत आहेत. काँग्रेस–राष्ट्रवादी काँगेसच्या नेत्यांचे जनतेप्रती असलेले ढोंगी प्रेम भाजपच्या कार्यकर्त्यांनी जनतेसमोर उघड करावे, असे आवाहन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. सावंतवाडी तालुका भाजपतर्फे सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ता आणि नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा सत्कार सोहळा येथील राजवाड्यासमोरील जागेत आयोजित केला होता.

मुनगंटीवार यांनी काँग्रेस–राष्ट्रवादी काँगेसवर हल्ला चढविला. ते म्हणाले, काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस पंधरा वर्षे सत्तेत होते. या काळात त्यांनी राज्याची तिजोरी लुटण्याचे काम केले. दोन्ही पक्ष आता रस्त्यावर उतरत आहेत. त्यांचे जनतेवर पुतना मावशीचे प्रेम आहे. त्यांच्यापासून जनतेला सावध करण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. त्यांचे अश्रू मगरीचे असून त्यांनी पंधरा वर्षात सत्तेत राहून काय केले, याचा हिशेब घेतला पाहिजे. काँग्रेस–राष्ट्रवादीवाले भाजपकडून तीन वर्षांचा हिशेब मागत आहेत. तीन वर्षात जादूच्या कांडीप्रमाणे आम्ही काही करू शकत नसलो तरी जनतेच्या हितासाठी भाजप सरकारने वेगवेगळे निर्णय घेतले आहे. शेतक-यांच्या कर्जमुक्तीचा निर्णय हा त्यातील महत्वपूर्ण निर्णय आहे. शेतकऱ्यांना ३८ हजार कोटी रुपयांची कर्जमुक्ती करण्यात आली.

Loading...

मात्र, विरोधक मुंगेरीलालसारखी स्वप्न पाहत आहेत. देशातील नरेंद्र मोदी सरकार जाण्यासाठी ते देव पाण्यात ठेवून आहेत. मात्र, ईश्वराचा अंश असलेल्या जनतेचा आशीर्वाद असल्याने केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार सत्तेवरून जाणार नाही. विरोधकांचे स्वप्न धुळीस मिळेल, असा आशावाद मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने जनेच्या विकासाच्या विविध योजना आणल्या आहेत. महिला बचतगटांसाठीचा निधी ४५ हजार कोटी रुपयांवरून ७५ हजार कोटीवर नेण्यात आला. चांदा ते बांदा योजनेमुळे चंद्रपूरबरोबर सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या विकासाला चालना मिळाली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी राज्याकडून उपलब्ध करण्यात येईल. ज्या गावात भाजप सरपंच, उपसरपंच उमेदवार निवडून आले, त्या गावांसाठी निधी देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. गोवा शासनाकडून सिंधुदुर्गातील रुग्णांना शुल्क आकारण्यात येत असेल तर या संदर्भातही तोडगा काढण्यात येईल, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

भाजप नेहमीच जनतेच्या हितासाठी काम करत आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कुठलेही काम पेले जात नाही. जनतेसाठी सरकार काम करत आहे. मात्र, जनता आणि सरकारमध्ये दुवा साधण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रमोद जठार यांनी भाजप सरकार सिंधुदुर्गच्या विकासासाठी काम करत आहे. विविध प्रकल्प आणतांना दलालांना दूर करून जनतेला थेट फायदा देण्याचे काम भाजप करीत आहे, असे त्यांनी सांगितले. राजन तेली यांनी सावंतवाडी विधानसभा मतदार संघाबरोबर जिल्हय़ातही भाजप वाढत आहे. मात्र, येथील पालकमंत्री दीपक केसरकर भाजपला सापत्नभावाची वागणूक देत असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात महेश सारंग यांनी भाजपच्या प्रगतीचा आढावा मांडला. तसे विकासासाठी पक्षनिधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल