मुंबई : १०५ आमदार निवडून येऊन सुद्धा विरोधी पक्षपदावर समाधान मानाव्या लागणाऱ्या भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपमधील नेत्याची तथाकथित नाराजी वेळोवेळी समोर आली आहे. तर आता या नाराजीचा उद्रेक होऊन पक्ष बदलाच्या हालचालींना वेग आल्याचे आज सकाळपासून होणाऱ्या राजकीय बैठकांवरून वर्तवले जात आहे.
भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर भाजपचे अन्य काही नेते देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा चर्चाना उधाण आलं आहे. यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी आमदारांची बैठक सुरू आहे. इतर पक्षातील विशेषतः भाजपातील नेत्यांना यांना राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश द्यायचा का याबाबत खलबत सुरू असल्याची चर्चा आहे.
या सगळ्या घडामोडींवर भाजपचे नेते सुधीर यांनी एकनाथ खडसे पक्ष सोडणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. “मी १९८० पासून भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्याशी अनेकदा बैठकीत, वैयक्तिक, प्रत्यक्ष संपर्क आला. त्यांची वैशिष्ट्यं, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू मी समजून घेतले आहेत. ते कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहेत. जिना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा, काही घटनांबद्दल मनामध्ये दु:ख असू शकते. पण कार्यकर्ता म्हणून एक विश्वास आहे की खडसे हे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
तर, “दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरीही खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही, प्रतिबंध घालतो. त्यामुळे खडसेंच्या मनाला दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचारच शिवू शकत नाही. हा विचार माझ्याही मनात शिवू शकत नाही आणि त्यांच्या मनात हा विचार येऊ शकत नाही.” अस देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर जयंत पाटलांचे मोठे विधान
- राष्ट्रवादी काँग्रेस देणार भाजपला मोठा धक्का? ‘या’ बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा!
- कोरोना बाधित रुग्णांना मिळेना रेमडीसीवीर इंजेक्शन, आ.जगताप यांचे आरोग्यमंत्री टोपे यांना साकडे
- फडणवीसची एम्स आणि मेयो रुग्णालयाला भेट
- माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना कोरोनाची लागण
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<