वाघाला कसं गोंजारायचं हे आपल्याला चांगलच ठाऊक – सुधीर मुनगंटीवार

टीम महाराष्ट्र देशा : वाघाला कसं गोंजारायचं हे आपल्याला चांगलच ठाऊक असल्याचं उत्तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला दिले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केल आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून युती पुन्हा होऊ शकते अशा आशयाचं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला होता. वाघाला गोंजारू नका अशी टीका सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून संजय राऊत यांनी केली आहे.तसंच ज्यांना मैत्रीची व्याख्याही माहित नाही ते मैत्री काय करणार अशी टीकाही या अग्रलेखात केली.

यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आपण सगळ्यात जास्त वाघ असलेल्या जिल्ह्यातले असून वाघाला कसं गोंजारायच हे आपल्याला चांगलंच माहित आहे. तसंच शिवसेनेच्या नेत्यांशी आपले घरोब्याचे संबध असल्याचही ते म्हणाले . तसंच हे दोन पक्ष एकत्र यावे ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जर सपा बसपासारखे कौरव एकत्र येऊ शकतात ,जे एकामेकाचे तोंडही पाहत नव्हते मग आपण तर पांडव आहोत आपण का एकत्र येऊ शकत नाही असं ते म्हणाले.

शिवसेना भाजप युतीबद्दल ते अत्यंत सकारात्मक दिसले ,हे दोन पक्ष एकत्र येणं ही जनांची भावना असल्याचंही त्यांनी सांगितलं.तसंच सेनेला धनुष्यबाण भेट देणार असल्याचंही ते म्हणाले.