Share

Sudhir Mungantivar | ‘शिंदे सरकार नामर्द आहे’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना सुधीर मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर; म्हणाले,

Sudhir Mungantivar | मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद वाढत चालला आहे. दोन राज्यांमधील हा वाद पाच दशकांहून अधिक जुना आहे. त्यामुळे राजकारणही होत आहे. अशातच बेळगाव येथे महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. यावरून संजय राऊत (Sanjay raut) यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका करत सरकार षंढ आणि नामर्द असल्याचं म्हंटल आहे. त्यांच्या या वक्तव्याला सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

“मागील अडीच वर्षांत त्यांचे सरकार (महाविकास आघाडी) होते. त्यावेळी त्यांनी का मर्दानगी दाखवली नाही. स्वत: आत्मचिंतन करून स्वत:ला उपमा देण्याचे काम तेच करू शकतात,” अशी खोचक टीका सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी केली.

दरम्यान, “संजय राऊत हे तीन महिने जेलमध्ये राहून आले. त्यामुळे ते षंढ, मर्दानगी, रेडे अशा शब्दांची भाषा शिकून आले. कैद्यांची अशा प्रकारची भाषा असते. मात्र महाराष्ट्रातील जनतेला ही भाषा सहन होणार नाही.” असं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) म्हणालेत.

संजय राऊतांचं वक्तव्य काय?

संजय राऊत म्हणाले, “शिंदे असतील किंवा फडणवीस, कारभार कुणाच्याही नावाने चालू द्या. महाराष्ट्राच्या अस्मितेचं, सार्वजनिक मालमत्तेचं, जमिनीचं रक्षण करण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे. सरकारला एकही दिवस सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही हे त्यांनी मान्य करायला हवं. सीमाभागात २४ तासांपासून सरकारी प्रेरणेनं महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड होतेय, हल्ले होतायत आणि प्रतिकार करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून तुरुंगात डांबलं जातंय. महाराष्ट्र सरकार आहे की नाही?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, “अशा प्रकारची वेळ यापूर्वी कधी आली नव्हती. दोन मंत्र्यांनी काल शेपूट घातलं. डरपोक सरकार आहे, महाराष्ट्राच्या जनतेची काळजी नाही सीमा कुरतडल्या जात आहेत. हे सरकार नामर्दासारखं बसलेलं आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्राववर असं संकट आलं आहे तेव्हा विरोधी पक्षाने लढाई केली आहे.” तसेच महाराष्ट्राचे लचके सहजपणे तोडता यावे म्हणुन शिवसेनेचे सरकार घालवलं आहे, असा घणाघातही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या :

Sudhir Mungantivar | मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद वाढत चालला आहे. दोन राज्यांमधील हा वाद पाच दशकांहून अधिक जुना …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now