अजितदादा-फडणवीस यांची भेट, म्हणजे कोणत्याही क्षणी ‘गोड’ बातमी

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आलेले पाहायला मिळाले. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांचा मुलगा यशवंत शिंदे यांचा शाही विवाह आयोजित करण्यात आला होता.

यावेळी २० मिनिटं चर्चाही झाली त्यामुळे अनेकांच्या भुवया पुन्हा उंचावल्या. दरम्यान, “लवकरच गोड बातमी कोणत्याही दिवशी, कोणत्याही महिन्यात या महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहे. आजची राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट म्हणजे या सरकारला कोणत्याही क्षणी स्थिगिती दिली जाऊ शकते”असं भाजप नेते आ.सुधीर मुनगंटीवार ) म्हणाले .

“शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचा जन्म मुळात विचाराच्या आधारावर, कामाच्या आधारावर किंवा विकासाच्या नावावर झाला नाही. तर सत्तेच्या महत्त्वकांक्षेपोटी झालेला आहे. या आघाडीने जनतेच्या जनादेशाचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे”, असा आरोपही यावेळी मुनगंटीवार यांनी केला.

दरम्यान, याबबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, या भेटीत ‘आम्ही हवापाण्याच्या गप्पा मारत होतो,’ असं मिश्किल उत्तर पवार यांनी दिले.ते पुढे बोलताना म्हणाले, ‘संजयच्या मुलाचं लग्न होतं. त्यांनी मला जरा आग्रह करून बोलावलं तसं इतर नेत्यांनाही बोलावलं होतं. लग्न समारंभात खुर्च्या अशा मांडल्या की माझी आणि फडणवीस यांची खुर्ची शेजारी शेजारी आली. शेजारी बसलो म्हणजे लगेच काही सुरू झालं असं समजण्याचं कारण नाही, असे पवार म्हणाले.दरम्यान, ‘आम्ही काय कोणाचे कायमचे दुश्मन नसतो. त्यामुळे विरोधक किंवा सत्ताधारी पक्षाचे नेते समोरासमोर आल्यानंतर एकमेकांना नमस्कार करतात, चर्चा होते, असे देखील अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या