भाजप सोडू शकत नाही हेच खडसेंनी अजित पवारांच्या कानात सांगितले- सुधीर मुनगंटीवार

अहमदनगर: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे मात्र काहीही झालं तरी एकनाथ खडसे भाजप सोडणार नाहीत तसेच मी भाजप पक्ष सोडू शकत नाही हेच खडसेंनी अजित पवारांच्या कानात सांगितले असल्याचा टोलाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. नवीन वर्षानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी गेले असता मुनगंटीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

नाराज एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादी आणि अजितदादांशी जवळीकता पाहून ते राष्ट्रवादीतही जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. राज्यातील पक्षवाढीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. खडसे 30 वर्षांपासून माझे परिचित आहेत. ते पक्ष सोडतील हे या जन्मात तरी माझ्या मनात येणार नाही तसेच मी भाजप पक्ष सोडू शकत नाही हेच खडसेंनी अजित पवारांच्या कानात सांगितले असल्याचा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

1 Comment

Click here to post a comment