अचानक विधानभवनातून “या” कारणामुळे सुप्रिया सुळे यांनी ठोकली धूम

टीम महाराष्ट्र देशा:  महाराष्ट्रविकासआघाडीचे सरकार बहुमत सिद्ध करून सत्ता स्थापन करण्यास सज्ज झाले आहे. विधानभवनावर आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. सकाळपासूनच विधानभवनावर राजकीय मंडळीची रेलचेल सुरू होती. सुप्रिया सुळे सर्वात अगोदर येऊन नवनिर्वाचित आमदारांच स्वागत विधानभवनावर करत होत्या.

अचानक विधानभवनावरून सुप्रिया सुळे अगदी लगबगीने धावत जाताना दिसल्या. अतिशय शांत आणि आनंदी असलेल्या सुप्रिया सुळे अचानक विधानभवनाबाहेर धावत आल्या आणि कुठेतरी निघून गेल्या. कदाचित उद्धव ठाकरे सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या भेटीला गेल्याचं म्हटलं जातंय. याकरता सुप्रिया सुळे धावत सिल्व्हर ओकला गेल्याचं म्हटलं जातंय.

विधान भवनात आज सर्व आमदारांना शपथ देण्यात आली. त्यावेळी अजित पवार, रोहित पवार, आदित्य ठाकरे यांच्यासोबतचे सुप्रिया सुळे यांचे फोटोची चांगलीच चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा मुहूर्तही १ डिसेंबर रोजी ठरला असून हा सोहळा शिवतीर्थावर होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Loading...