महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कानडी प्रशासनाकडून अचानक अडवणूक; सतेज पाटलांनी दिला आक्रमक इशारा

satej patil

कोल्हापूर : राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कर्नाटक सरकारकडून खबरदारीचे पाऊल उचलले गेले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी केली जात आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता कर्नाटक सरकारने कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अनिवार्य केल्याने अनेक प्रवाशांचा खोळंबा होत आहे.

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक सरकारने प्रवेशबंदी केली आहे. केवळ 72 तासाच्या आतील कोरोना निगेटिव्ह असलेल्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. या अडवणुकीवर गृहराज्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त करून कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.

‘कोरोना संसर्ग वाढत असला तरी, महाराष्ट्रतील नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करुन त्यांना कर्नाटकमध्ये प्रवेश द्यावा. कर्नाटक सरकार आडमुठी भूमिका घेत असेल तर आम्हालादेखील कर्नाटकचे प्रवाशी महाराष्ट्रात घेताना विचार करावा लागेल. कर्नाटक सरकारच्या या भूमिकेबाबत मी केंद्राला माहिती देणार आहे,’ अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली आहे. तर, ‘कर्नाटक सरकारने प्रवाशांची कोरोना चाचणी करून त्यांना क्वॉरन्टाईन करावं, आम्हाला काहीही हरकत नाही,’ अशी भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केली आहे.

महत्वाच्या बातम्या