महाराष्ट्र देशा इम्पॅक्ट: अखेर राष्ट्रवादीकडून ‘त्या’ कार्यकर्त्याच्या कार्याचा गौरव

टीम महाराष्ट्र देशा: आपली दहाही बोटे काम करत नसताना देखील फेसबुकवर ‘एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक’ नावाने ग्रुप काढत राष्ट्रवादीच्या लाखो कार्यकर्त्यांना एका छत्राखाली आणण्याच काम करणाऱ्या सुदर्शन जगदाळे या युवकाच्या कार्याची दखल पक्षाकडून घेण्यात आलीय. सुदर्शन करत असलेले काम ‘महाराष्ट्र देशा’ने सर्वासमोर मांडले होते. त्यांतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र सोशल मिडीया सचिव पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष रविकांत वरपे, आणि पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य अभिषेक बोके यांच्या हस्ते सुदर्शन जगदाळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले,  या वेळी माजी आमदार अशोक पवार, तालुका अध्यक्ष रवीबापू काळे, युवक अध्यक्ष कुंडलीकराव शितोळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी सोशल मिडीया अध्यक्ष संतोष कोलते, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, सदस्या कुसुमताई मांढरे, पंचायत समितीच्या उपसभापती मोनिका ताई हरगुडे आदी उपस्थित होते

हाताचे एकही बोट हालत नसताना, त्याने चंग बांधला एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक जोडण्याचा

सुदर्शन जगदाळे हा मुळचा पुणे जिल्ह्यातील शिरूरमधला, आपली दहाही बोटे काम करत नसताना देखील या पठ्याने ‘एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक’ नावाने फेसबुकवर ग्रुप काढत राष्ट्रवादीच्या लाखो कार्यकर्त्यांना एका छत्राखाली आणण्याच काम केलं आहे. मुख्यतःहा सध्या सर्वच पक्षाचे नेते आपल्या फेसबुक अकाउंट अथवा पेजवरून सर्वांशी संवाद साधत असतात. मात्र हे एकाच बाजूने होत असल्याच दिसत, मात्र तुमचा फेसबुक ग्रुप असल्यास येथे चर्चेच्या फैरीझडू शकतात. आपल्याला पटणारी धोरणे, पक्षाची कामे याच्यावर चर्चा होवू शकते हेच एकद्या ग्रुपच विशेषत्व असू शकत. हेच काम सध्या सुदर्शन हा करत आहे.

‘एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक’ गुपमध्ये सध्या राज्यभरातील राष्ट्रवादीला मानणारे २ लाख ९ हजार कार्यकर्ते एकत्र आले आहेत. यामधील जवळपास दीड ते दोन लाखांच्यावर अॅक्टीव्ह लोक रोज वेगवेगळ्या विषयावर, पोस्टवर लाईक कॉमेंट करत असतात तसेच आपल्या नेत्यांनी काम कस आहे, आणखीन काय करायला हव याचीही चर्चा होते.

सुदर्शन जगदाळे यांच्या कामाच कौतुक देखील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आल आहे. तर शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांनी सुदर्शनला दिलेली साथ देखील त्याच्या कामाला वाव देणारी आहे. दरम्यान आता राष्ट्रवादीचे राज्यभरातील पदाधिकारी हे या ग्रुपवर थेट ‘लाईव्ह’ सर्वांशी संवाद साधत आहेत.Loading…
Loading...