अझानविरोधी ट्विटमुळे सुचित्राला बलात्काराची धमकी

वेबटीम : प्रख्यात अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीने अजानमुळे होत असलेल्या त्रासाबद्दल एक ट्विट केलं होतं. मात्र या ट्विटमुळे तिला सोशल मीडियावर उघड उघड बलात्काराच्या धमक्या देण्यात येत आहेत
ट्विट करत मशिदींवरील भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात सुचित्राने वाज उठवला होता. ज्यात तिने म्हटलं होतं की पहाटे ४.४५ वाजता कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात अजान सुरू होते, ही धर्म लादण्याची जबरदस्ती कशाला ?
यामुळे काही धर्मांध लोकांकडून तिला बलात्काराची धमकी मिळाली आहे. या ट्विटमुळे सुचित्राने ताबडतोब पोलीस स्टेशन गाठलं आणि समाजमाध्यमांवरून होत असलेल्या लैंगिक छळाबद्दल तक्रार नोंदवली.अनेक धर्मांध लोकांकडून तिला दिलेल्या धमक्यांची ट्विट तिने मुंबई पोलिसांना रिट्विट करून त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहेत. अशा लोकांविरूद्ध काय कारवाई केली जाऊ शकते असा सल्ला तिने पोलिसांकडून मागितला आहे. सुचित्राचा पती शेखर कपूरनेही सुचित्राचं समर्थन करत ट्विटरने अशा माथेफिरूंना आवर घालायला पाहीजे असं मत व्यक्त केलंय.
अबू आझमींनी केले आगीत तेल ओतण्याचे काम
दारू पिणाऱ्यांना आणि तोकडे कपडे घालणाऱ्या महिलांना अशी टीका करण्याचा अधिकार नसल्याचे ते म्हणाले. ‘अजान’बाबत ट्विट करणे आता एक फॅशन झाल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात रात्र-दिवस भजन-कीर्तन चालते पण त्याला कोणीही विरोध करत नसल्याचे त्यांनी नमूद केले.-अबू आझमी
दरम्यान यापूर्वी सोनू निगम यांनीही केले होते ट्विट
गायक सोनू निगम यांनी 17 एप्रिल रोजी 3 ट्विट केले होते. त्यात त्यांनी ‘अजान’बाबत आणि मंदिर, गुरुद्वारात होणाऱ्या लाऊडस्पीकरच्या वापराबाबत नापसंती व्यक्त केली होती.