अशा रुग्णांची करा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना तपासणी, या ग्रामीण क्षेत्रात होतेय मागणी 

corona test

गोरेगाव : जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत आहेत. शहरात व खेड्यातही मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण व शहरातील सर्वच रुग्ण शहरातील दवाखान्यात जात असल्याने मोठी गर्दी दिसून येत आहे. म्हणून ग्रामीण भागातील रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना तपासणी व प्राथमिक उपचाराची सुविधा द्या अशी मागणी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जे डी जगनित यांनी केली आहे.

सध्या जिकडेतिकडे कोरोना चे प्रमाण वाढत आहे.ग्रामीण भागातील कोरोना रुग्नांना शहरातील रुग्णालयातच जावे लागते. सरकारी रुग्णालयात गर्दी मुळे जागा मिळत नाही मग रुग्णाची अव्यवस्था होते. खाजगी रुग्णालयातआगावू मोठी रक्कम घेऊन रुग्णांना भरती करण्यात येत आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्ण पैशा अभावी शहरातील रूग्णालयात उपचार घेऊ शकत नाही. ईकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती गोरगरीब रुग्नांची होत आहे.शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण रुग्णासाठी औषधोपचार करण्यासाठी वरदान ठरणारे आहे.

साधारण मोठ्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय आहे.त्या रुग्णालयात कोविड तपासणी व प्रथमोपचाराची सुविधा करावी आणि ग्रामीण रुग्णांना औषधोपचार द्यावा.यामुळे शहरी रुग्णालयात गर्दी होणार नाही.खाजगी रुग्णालयात रुग्णांची होत असलेली लुटमार थांबेल. म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात व ग्रामीण रुग्णालयात कोरोनाचे प्रथोमोचार सुरु करावे.अशी मागणी भाजपचे अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष जे.डी.जगनित यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-