असा राजकारणी पुन्हा होणे नाही, यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले दुःख

असा राजकारणी पुन्हा होणे नाही, यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले दुःख

मुंबई: राजकारणातील भीष्म पितामह गणपतराव देशमुख यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.त्यांच्या जाण्याने राजकारणातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. गणपतराव देशमुख यांच्या जाण्याने महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. चारित्र्य, संयम, कणखरपणा, विकास आणि प्रचंड लोकसंग्रह राखत गणपतराव यांनी आजच्यासारखे काळातही सत्व जपलं होतं. असा राजकारणी पुन्हा होणे नाही.अशी शोकभावना महिला व बाल विकास कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

गणपतराव देशमुख एकाच मतदारसंघातून आणि शेकाप या एकाच पक्षाकडून सर्वाधिक अकरावेळा निवडून आलेले आणि तब्बल ५० वर्षे राज्याच्या विधानसभेत आमदार राहिले आहे. मोहोळ या तालुक्यात पेनूर येथे १० ऑगस्ट १९२६ रोजी एका शेतकरी कुटुंबात गणपतराव देशमुख यांचा जन्म झाला.तब्बल ५० वर्ष त्यांनी राजकारणात कारकीर्द निभावली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गज राजकारण्यांनी गणपतराव देशमुख यांच्या निधनाने शोक व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या