एका ड्रायव्हरने उतरवले होते त्याला कॅबमधून खाली; म्हणून जिद्दीने उभारली टॅक्सी सर्विस देणारी “ओला कॅब” कंपनी

success story of ola cab service company

भावना संचेती: पुण्यासारख्या शहरात जर कोणत्याही ठिकाणी जायचं असेल तर, स्वता:च वाहन नसेल तर सहसा रिक्षा किवां भाड्याच्या गाडीला प्राधान्य दिल जात. पण रिक्षा किवां भाड्याची गाडी मिळण फार जिकरीच काम आहे, मात्र. गेल्या काही वर्षात प्रवास करण सोप्प झाल आहे. स्मार्ट फोनच्या मदतीने अगदी काही मिनिटांत आपल्याला टॅक्सी उपलब्ध होते. उबेर, मेरू या परकीय कंपन्या या टॅक्सी व्यवसायात अग्रेसर आहेत. पण ओला ही भारतीय कंपनी या परदेशी कंपन्यांना बाजारपेठत तगडी फाईट देताना दिसत आहे.

ओला या भारतीय टॅक्सी स्टार्टअप कंपनीची सक्सेस स्टोरी नवीन युवा उद्योजकांना नक्कीच प्रेरणादाई ठरणार आहे. मुंबई आय आय टी मधून कॉम्पुटर सायन्स विषयात पदवीधर असलेल्या भावेश अग्रवाल याने ओला या टॅक्सी सर्विस कंपनीची सुरुवात केली. आय.आय.टी मधून पदवी घेतल्यानंतर भावेश मायक्रोसॉफ्ट या नामांकित कंपनीत रिसर्चर म्हणून काम करत होता. त्यावेळी स्वता:च अस काही कराव या विचाराने भावेशने मायक्रोसॉफ्ट मधील नोकरी सोडली.
Bhavish Aggarwal

मायक्रोसॉफ्ट मधील चांगल्या पगाराची नोकरी सोडल्यामुळे भावेशला अनेकांनी वेड्यात काढले. पण भावेश आपल्या निर्णयावर ठाम होता. मायक्रोसॉफ्ट मध्ये असताना भावेशला दोन पेटंट मिळाले होते. या बरोबर त्याचे ३ रिसर्च पेपर देखील प्रकाशित केले होते. पण त्यांला सुरक्षित अशा ९ ते ५ च्या नोकरीमध्ये काडीमात्र रस नव्हता. भावेशला स्वता:च अस काही करायच होत. आणि या जिद्दीतून त्यांने २०१०-२०११ या कालावधीत ओला या टॅक्सी सर्विस कंपनीची सुरुवात केली.

भावेश एकदा एका टॅक्सीतून प्रवास करत होता. त्यावेळी अचानक त्या टॅक्सी चालकाने मध्येच टॅक्सी थांबवली आणि पैशाची मागणी केली. या खराब अनुभवातून भावेश बरेच काही शिकला आणि लोकांचा त्रास कमी करण्यासाठी त्यांनी स्वस्त, सुरक्षित आणि जलद टॅक्सीसेवा देण्याचा व्यवसाय सुरु करण्याचे ठरविले. आणि यातूनच सुरु झाली ओला टॅक्सीची सुरुवात.

ओला टॅक्सी सर्विसला भावेश ने तंत्रज्ञानासोबत जोडले यामुळे प्रवाशांना चांगली सुविधा देता येईल. या बरोबरच प्रवाशी फोनद्वारे टॅक्सी बुक करतील आणि त्यांची लुट देखील होणार नाही. २०१० मध्ये भावेश प्रमाणे स्वताच काही करण्याची उर्मी असलेल्या अंकित भाटी आणि भावेश ची भेट झाली. भावेश व अंकित हे आय.आय.टी मधील मित्र होते. व यानंतर अंकित व भावेश यांनी भागीदारीत व्यवसायाला सुरुवात केली.

भावेश यांने जेव्हा व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या आई वडिलांना खूप प्रश्न सतावात होते. त्यांना वाटत की आपला मुलगा केवळ गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय करत आहे. पण जेव्हा ओलाची पहिली कमाई आली तेव्हा त्यांना आपला मुलगा काय करतो हे समजल.

भावेश आपल्या व्यवसायाकरीता इतका देह्वेडा होते की त्यांनी आयुष्यभर स्वताचे वाहन न घेण्याचा प्रण केला ज्यामुळे ओला सर्विसचा वापर तो स्वता:ही करू शकेल, आज ओलाकडे स्वताची एकही टॅक्सी नाही. ओला या व्यवसायात अनेकांना भागीदार करून घेते आणि त्यांना नवीन व्यवसायाच्या संधी पूरविते, चालक,मालक आणि ओला हे सर्व मिळून ग्राहकांना सेवा पुरवितात. भावेश तरुणांना एक कानमंत्र देतो. स्वप्न तर सर्वच पाहतात,पण त्यासाठी जोखीम मात्र काही मोजकेच उचलतात स्व्प्न पूर्ण करण्याची धमक असेल तरच स्वप्न पाहावी. सल्ले तर अनेक देतात पण ऐकावे जणांचे करावे मनाचे. आज ७० हून अधिक शहरात सेवा पुरवते.