अवघा दहावी शिकलेला रेडीओ रिपेअरिंग करणारा आज आहे दोनशे कोटींचा मालक

जाणून घ्या अस्सल मराठमोळ्या antivirus. मॅनची यशोगाथा

स्टीव जॉब, मार्क झुगेरबर्ग, किंव्हा सचिन तेंडुलकर यासारख्या व्यक्तीकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नसताना त्यांनी त्यांच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे ते आज अनेकांचे आदर्श बनले आहेत. अशा लोकांनी जगाला दाखून दिले आहे की पुस्तकी ज्ञानापेक्षा कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा तिसरा अॅगल असला की स्वप्नाकडे जाण्याचा मार्ग मिळत जातो. स्टीव जॉब, मार्क झुगेरबर्ग, किवां सचिन तेंडुलकर हे झाले जगप्रसिद्ध व्यक्ती ज्यांनी स्वताच्या आत्मविश्वासावर जगात आपला दबदबा निर्माण केला, आणि जगाला त्यांची दखल घ्यावी लागली.

आज अशाच एका पुणेकर अवलियाला आपण भेटणार आहोत ज्यांच्याकडे संगणक क्षेत्रातील कोणतीही डिग्री नसताना आज तो जगातील कित्येक कॉम्पुटर, मोबाईल. लॅपटॅाप यांचे संरक्षण करत आहे. मोबाइल किवां लॅपटॅाप यांना virus पासून वाचविण्यासाठी एक नाव विश्वासाने घेतले जाते ते म्हणजे क्विक हील antivirus. हे नाव जरी परदेशी वाटत असल तरी क्विक हीलचा जन्म पुण्यात झाला असून कैलास काटकर या मध्यमवर्गीय घरातून पुढे आलेल्या मराठी माणसाने क्विक हीलची स्थापना केली आहे.

कैलास काटकर यांचा जन्म महाराष्ट्रातील रहिमपूर येथे झाला. कैलास यांचे वडील पुण्यातील फिलिप्स या कंपनीत कामाला होते. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे कैलास यांनी १० तून शाळा सोडून दिली. घरी काही आर्थिक हातभार लावता यावा या करता कैलास यांनी रेडीओ,व कॅल्कूलेटर रिपेरिंगला सुरुवात केली. त्यातून त्यांना दरमहा ३५० रुपये मिळत. दोन तीन वर्षानंतर काटकर यांनी रेडीओ,व कॅल्कूलेटर रिपेरिंगचा स्वताचा व्यवसाय सुरु केला.

१९९० ते १९९५ च्या काळात मोठ्याप्रमाणात संगणक क्रांती होत होती. हेच लक्षात घेत कैलास यांनी कॉम्पुटर चे काही कोर्स केले. दिवसभर त्यांचा व्यवसाय सांभाळून ते संध्याकाळच्या वेळेत कोर्स करत. कॉम्पुटर कोर्स केल्यानंतर कैलास यांनी छोट्या- मोठ्या कंपन्याचे कॉम्पुटर मेंटेनन्सची कामे घेण्यास सुरुवात केली.

कॉम्पुटर मेंटेनन्सची कामे करत असताना कैलास यांच्या असे लक्षात आले की virus मुळे कॉम्पुटरचे व कंपन्याचे ही फार मोठे नुकसान होत आहे. याकरता काही करणे गरजेचे आहे. कैलास यांना परिस्थितीमुळे आवड असताना देखील शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या लहान भावाला कॉम्पुटर इंजिनिअर बनविले. कैलास यांनी त्यांच्या भावाला virus मुळे होत असलेल्या नुकसानाची माहिती दिली आणि याकरता काही करता येईल याविषयी सांगितले.

कैलास यांचा लहान भाऊ संजय यांने antivirus बनविण्यास सुरुवात केली. antivirus बनवून तयार झाल्यानंतर त्यांचे नाव ठेवले क्विक ही . पण ग्राहक क्विक हीलला स्वीकारण्यास तयार नव्हते त्यांची मानसिकता बदलणे फार अवघड होते. याकरता कैलास यांनी सुरुवातीला मोफत आणि स्वस्त दारात antivirus विकण्यास सुरुवात केली . १९९८ मध्ये ‘नताश’ या व्हायरसमुळे पूर्ण जग चिंतेत होते. या व्हायरसमुळे अनेक फाईल डीलीट झाल्या होत्या पण क्विक हीलमुळे त्या व्हायरसमुळे झालेले नुकसान भरून आले. यामुळे क्विक हील जगभरात नावारूपास आले. आज क्विक हील ६० हून अधिक देशात विकले जाते. जगभरात ३५ शाखा असून २०० करोड इतका वार्षिक टर्न ओव्हर आहे

You might also like
Comments
Loading...