PM मोदींच्या ‘मन की बात’मध्ये पुण्याच्या शेतकऱ्यांची यशोगाथा

narendra modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ मधून कृषी विधेयकांना विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांना टोला लगावला आहे. शेतकऱ्यांवरील बाजार समितीचे निर्बंध हटवल्याने त्यांना फायदा होत आहे. अनेक शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं आहे. शेती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आलं आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. ‘आत्मनिर्भर भारत’ बनवण्यात शेतकऱ्यांची मोठी भूमिका आहे, असं मोदींनी सांगितलं.

केंद्र सरकारने अलिकडेच कृषी क्षेत्रासंदर्भात तीन विधेयकं आणली आहेत. या विधेयकांना संसदेत तीव्र विरोध झाला. ‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचे अनुभव सांगत नवीन तरतुदींची माहिती दिली. अनेक शेतकऱ्यांची पत्रं येतात. मी शेतकरी संघटनांशी बोलतो. ज्यात शेतीमध्ये नवीन पैलू केसे जुळत आहेत. यामुळे शेतीत कसे बदल होत आहेत हे समोर येतंय.

हरयाणाच्या सोनीपत जिल्ह्यात कंवर चौहान हे एक शेतकरी. त्यांना आधी बाजार समितीबाहेर आपली फळं आणि भाजीपाला विकण्यात खूप अडचणी येत होत्या. आपली फळं आणि भाजी मंडईच्या बाहेर विकत असताना बऱ्याचदा त्यांची फळं, भाज्या आणि गाड्या जप्त करण्यात आल्या. पण २०१४ मध्ये एपीएमसी कायद्यातून फळे आणि भाज्या हटवण्यात आल्या. याचा त्यांना आणि जवळपासच्या इतर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पुण्याचे शेतकऱ्यांची यशोगाथा

शेतकऱ्यांना आता त्यांची फळं आणि भाज्या कुठेही कोणाकडेही विकण्याची ताकद आहे आणि ही शक्ती त्यांच्या प्रगतीचा आधार आहे. आता ही शक्ती देशातील इतर शेतकर्‍यांनाही मिळाली आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात फळं आणि भाजीपाला एपीएमसी कायद्यातून वगळण्यात आलं होतं. या बदलामुळे महाराष्ट्रातील फळ आणि भाजीपाला उत्पादकांची परिस्थिती चांगली झाली आहे.

पुण्यातील श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड मोठे यश मिळवले आहे. हा शेतकऱ्यांचा समूह आहे. पुणे आणि मुंबई मधील शेतकरी स्वतः साप्ताहिक बाजारपेठा चालवत आहेत. या बाजारात सुमारे ७० गावातील साडेचार हजार शेतकर्‍यांचा समावेश आहे. ते आपलं उत्पादन थेट विकत आहेत. व्यापरी आणि दलालांचा यात समावेश होत नाही. ग्रामीण तरुण थेट बाजारात शेतमाल विक्रीच्या प्रक्रियेत सहभागी होत आहेत.

याचा थेट फायदा शेतकऱ्याना होतोय. खेड्यांमधील तरुणांना रोजगार मिळत आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी करोना संकटाचाही उल्लेख केला. करोनाने आपल्याला एकत्र आणलं. विखुरलेली कुटुंब एक झाली. कुटुंबात आपलेपणा आणि जिव्हाळा वाढला. संपूर्ण कुटुंब अधिक जवळ आलं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. चार वर्षांपूर्वी दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला.

भारताच्या शूरवीर जवानांची कामगिरी जगासमोर आली. भारतीय जवानांनी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावले, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. देशात ऐतिहासिक कथा आणि गोष्टी सांगण्याची एक समृद्ध परंपरा आहे. या कथांमधून भावना आणि संवेदनशील बाजू समोर येते. लहान मुलांना अशा गोष्टी आणि कथा ऐकायला खूप आवडतात. तामिळनाडू, केरळमध्ये कथा सांगण्याची वेगवेळी परंपरा आहे. त्यांना विल्लू पाट असं म्हटलं जातं. संगीत आणि गोष्टींचा आकर्षक मेळ घालून त्या मुलांसमोर मांडल्या जातात. धार्मिक कथा सांगण्याची देशातील परंपरा प्राचीन आहे.

महत्वाच्या बातम्या :-