कधी काळी रिक्षा भाडे देण्यासाठी नव्हते पैसे आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये त्याचेच अॅप

paytm founder vijay shekhar sharma

‘पेटीएम’ काही महिन्यापूर्वी निवडक भारतीयांच्या मोबाईलमध्ये असणारे हे एप्लिकेशन आज जवळपास सर्वांच्याच जीवनाचा एक भाग बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी जाहीर केल्यानंतर सर्वात जास्त कोणाचा फायदा झाला असेल तर तो पेटीएमचा. मोबाईलचा रिचार्ज असो कि हॉटेलच बिल आज प्रत्येक ठिकाणी पेटीएमचा वापर होताना दिसत आहे. मात्र अस असल तरी एका दिवसात हे घडलेलं नाहीये या मागे अनेक लोकांची मेहनत आहे,

पेटीएम – ‘पे थ्रू मोबाईल’
पेटीएमचा इतिहास समजण्यासाठी या कंपनीच्या मागे ज्याच डोक आहे त्या व्यक्तीबद्दल पहिल्यांदा बोलूयात . विजय शेखर शर्मा ज्यांनी आज कंपनीला एका यश शिखरावर नेऊन ठेवल आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये विजय शर्मा यांना खूप अडचणींना समोर जाव लागल होत. एक वेळ अशी हि आली कि चहा पिण्यासाठी किंवा रिक्षाला देण्यासाठी त्यांच्या खिश्यात पैसे नव्हते. मात्र, आज जे आहे ते विजय यांनी केलेले हार्डवर्क आणि हार न मानण्याच्या जिद्द्दीमुळे.

विजय शेखर शर्मा हे मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात. त्यांची आई गृहिणी तर खासगी ट्युशन घेण म्हणजे पाप असते असे मानणारे त्यांचे वडील एका शाळेत शिक्षक होते. विजयच प्राथमिक शिक्षण हिंदी मिडीयम शाळेतून झाले. पुढे दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनियरींममध्ये ते दाखल झाले, प्राथमिक शिक्षण हिंदीतून तर इंजिनियरिंग इंग्लिशमध्ये असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र जिद्दीच्या जोरावर विजयने इंग्लिश भाषेवर विजय मिळवला.

विजय शेखर यांनी याहू चे संस्थापक साबीर भाटीया यांच्याशी प्रेरित होवून ऑनलाईन बिझनेसमध्ये उतरण्याचा विचार केला. जस कि याहूची निर्मिती Stanford College Campus मध्ये झाली होती. त्याप्रमाणे विजयही तिथे जाऊन शिक्षण घेऊ इच्छित होता. मात्र घरच्या परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. अस असल तरी त्यांनी Stanford च्या काही विद्वानाची पुस्तके वाचण्यास सुरुवात केली आणि त्यातूनच कोडींग शिकले. कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला असताना शेखर यांनी XS नावाची कंपनी स्थापन केली. त्यांचा हा बिझनेस मॉडेल खूप गाजला. पुढे १९९९ मध्ये विजय शेखरने आपली कंपनी यूएसएच्या Lotus Interworks ला 5,00,000 डॉलरमध्ये विकली. आणि त्याच कंपनीत नौकरी करू लागले. मात्र दुसऱ्याची नौकरी करन त्यांना पसंत आल नाही म्हणून त्या कंपनीला रामराम ठोकला.

ONE 97 ची स्थापना
नौकरी सोडल्यानंतर विजयने ONE 97 कंपनीची ची स्थापना केली. आजवर मिळवलेली सर्व कमाई त्यांनी या कंपनीत लावली मात्र कंपनी लवकरच डबघाईला आली. व्यवसायिक अपयश आपल्याला मानसिक आणि पैशाने कमजोर बनवते याच गोष्टीचा सामना विजय शेखर यांना देखील करावा लागला. त्यांच्यावर एकवेळ अशी आली कि कुठे जायचं तर चालत आणि संपूर्ण दिवस केवळ दोन कप चहावर. मात्र यातून हार न मानता त्यांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागत पेटीएमची सुरुवात केली.

आता कंपनी बाबत बोलायचं म्हणल तर paytm एक mobile commerce platform आहे. जे कधीकाळी फक्त मोबाईल आणि बिल भरण्याची सुविधा देत होते. मात्र आज पेटीएम हे flipkart , snapdeal आणि amazon सारख्या कंपन्याप्रमाणे एक ऑनलाईन शॉपिंग मॉल झाला आहे तिथे तुम्ही शॉपिंग करू शकता. नोटबंदीनंतर ज्या मोबाईल वॉलेट कंपन्यांना फायदा झाला त्यात सर्वात पुढे पेटीएमच आहे.

पेटीएम इतिहास
२०१० साली One97 Communications कंपनीने वेबसाईट स्वरुपात पेटीएम बाजारात आणले. ज्यावरून युजर हे आपला मोबाईल रिचार्ज करू शकत होते. त्यानंतर आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार २०१३ मध्ये पेटीएम वॉलेट बाजारात आले. आजच्या काळामध्ये पेटीएमला वापरण एकदम सोपे आहे . तसेच रिचार्ज करताना किंव्हा खरेदी करताना काही अडथळा आल्यास काही वेळातच आपले पैसे माघारी मिळतात. तसेच पेटीएमने सुरु केलेल्या ऑनलाईन शॉपिंग खरेदीच्या फिचरमुळे आज भारतात सर्वात जास्त वापरले जाणारे ई-वॉलेट बनले आहे.

अजून एक खास गोष्ट म्हणजे देशातील प्रसिद्ध व्यावसायिक असणारे टाटा समूहाचे रतन टाटा यांनी मार्च २०१५ मध्ये पेटीएममध्ये पर्सनल गुंतवणूक केली. यामुळे पेटीएम हि देशातील अशा निवडक कंपन्यांच्या यादीमध्ये सामील झाली ज्यामध्ये रतन टाटा यांनी गुंतवणूक केली आहे. तर चीनची प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अली बाबाने ५७५ मिलियन डॉलरची गुंतवणूक करत पेटीममध्ये सर्वात मोठी हिस्सेदारी घेतली आहे.