पिग्मी एजंट ते दोनशे कोटींचे साम्राज्य; मराठवाडा भूषण गणपतराव मोरगे यांचा थक्क करणारा प्रवास

marathwada bhushan ganpatrao morge

टीम महाराष्ट्र देशा: आपल्यामध्ये कष्ट करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही शिखर पार करण अवघड नाही. हेच दाखवून दिल आहे ते मराठवाडा भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेले गणपतराव बळवंतअप्पा मोरगे यांनी. शुक्रवार ( २ मार्च ) रोजी गणपतराव मोरगे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठवाड्याची कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, एकेकाळी जिल्हा बँकेसाठी पिग्मी एजंट म्हणून काम करणाऱ्या कै. गणपतराव मोरगे यांनी आज ‘शारदा कंस्ट्रक्शन’च्या रूपाने २०० कोटींच्यावर टर्नओव्हार असणाऱ्या व्यवसायाची उभारणी केली आहे.

Loading...

जिल्हा बँकेत पिग्मी एजंट ते मंत्रालयातील क्लर्क
गणपतराव मोरगे हे मुळचे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यामध्ये असणाऱ्या मांडूरकी गावचे. पाच भाऊ आणि एक बहिण असा संपूर्ण गोतावळा म्हणजे गणपतरावांचे कुटुंब. वडिलांची पाच एकर शेती तीही कोरडवाहू त्यामुळे परिस्थिती तशी जेमतेमच, आपल्या मुलाने शिकून शिक्षक व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र मॅट्रिकच्या परीक्षेत ४३.५ टक्के गुण मिळाल्याने त्यांनी डी.एड. करण्याचा नाद सोडला आणि बी.ए.मध्ये शिक्षण पूर्ण करत नौकरीचा शोध सुरु केला.

शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच नौकरी काही मिळेना. पण जेमतेम परिस्थितीमुळे काहीतरी काम करणे गरजेच असल्याने त्यांनी उस्मानाबाद जिल्हा बँकेत पिग्मी एजंट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पुढे अशा कामात स्थैर्य नसल्याने पुन्हा एकदा नौकरीचा शोध सुरु केला. नशिबाने साथ दिल्याने १९७९ मध्ये महाराष्ट्र राज्य निवड मंडळातर्फे जलसिंचन विभागात ‘क्लर्क’ म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. ७८-७९ च्या काळात पिग्मी एजंट असणारे गणपतराव मोरगे यांना हजार रुपये मिळायचे मात्र सरकारी नौकरी मिळाल्यावर पगार सुरु झाला ४७५ रुपये. पिग्मीच्या तुलनेत ही रक्कम तशी निम्मीच मात्र सरकारी नौकरी असल्याचे केवळ समाधानच.

जिद्दीला मिळाली योग्य संधीची साथ
१९८१ मध्ये गणपतरावांची बदली भोकर तालुक्यातील भोसी येथे झाली. शासनाच्या जलसिंचन विभागत काम करत असताना १९८२ मध्ये त्यांचे लग्न झाले. नौकरी सुरु असतानाच अजून काहीतरी काम करता येईल का याचा शोध ते घेत होते. अशा वेळी एक संधी त्यांना चालून आली आणि त्याच संधीचे सोने त्यांनी करून दाखवले. झाले असे कि, भोसे येथे काम करत असताना ‘जलसिंचन’च्या कामासाठी लागणारे २५ हजार गोणी सिमेंट तेथील गोदामात आले होते. मात्र पावसाळा तोंडावर आल्याने सिंमेंट ठेवलेल्या गोदामाचे पत्रे पाऊस- वाऱ्यात उडून जाण्याची शक्यता होती. हे होवू नये यासाठी पत्र्यांवर वजन ठेवण गरजेच होत, तेथे अधिकारी असणारे रुऊफ यांनी हे काम कोण करेल का अशी विचारणा केली आणि पुढे ‘तुम्हीच हे काम करून टाका’ म्हणून मोरगे यांना संगीतले. गणपतरावांनी आपले भाऊ शंकरराव यांचा नावाने हे काम घेतले आणि एका दिवसात ते पूर्णही केले. याचा मोबदला मिळाला तो त्यांच्या दीड वर्षाच्या पगार एवढा होता. हीच गोष्ठ त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.

एका गोदामावर पत्रे ठेवण्याच्या कामाने गणपतरावांचे मनोबल चांगलेच उंचावले. १९८९ मध्ये शंकरराव यांच्या नावावर ‘कॉंन्टॅ्क्टरशिप’ची नोंदणी करण्यात आली. एकामागून एक छोटी-मोठी कामे सुरूच होती. पुढे त्यांनीही नौकरी सोडत पूर्णवेळ ‘शारदा कंस्ट्रक्शन’चे काम सुरु केले. कधीकाळी हजारो रुपयांत असणारा व्यवसाय आज २०० कोटींच्या टर्नओव्हारवर जाऊन पोहचला आहे. हे सर्व शक्य झाले ते केवळ गणपतराव मोरगे यांच्या दूरदृष्टी आणि जिद्दीमुळेच.

सामाजिक बांधिलकी जपणारे गणपतराव
व्यवसायात अग्रेसर असणारे गणपतराव हे सामाजिक कामात देखील तेवढेच पुढे होते. आजवर हजारो हातांना त्यांनी काम मिळवून दिल आहे. जवळपास अडीचशे गरीब घरातील मुलींच लग्न त्यांनी स्वखर्चातून केली आहेत. तसेच समाजाचे देणे म्हणून २०० ते ३०० च्या आसपास मंदिरांचा जीर्णोद्धार मोरगे यांच्याकडून करण्यात आला आहे. गरजू लोकांना मदत करण्यात कायम ते अग्रेसर असत. त्यामुळेच आजवर मराठवाडा भूषण, विकास भूषण, इंदिरा गांधी सद्भाभावना पुरस्कार, कृषीनिष्ठ सारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.Loading…


Loading…

Loading...