पालकमंत्री गिरीश बापट यांच्या प्रयत्नांना यश

गिरीश बापट

मुंबई : पुणे शहराच्या कचरा समस्येला सोडविण्यासाठी शहरातील उरळी-फुरसुंगी येथील कचरा डेपोसाठी जमीन दिलेल्या कुटुंबियांच्या एका पात्र वारसास पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनावर सामावून घेण्यासाठी पालकमंत्री गिरीष बापट हे सातत्याने पाठपुरावा करित होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. आज दिनांक झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला.
पुणे शहरातील उरळी-फुरसुंगी येथील कचरा डेपोसाठी जमीन देणाऱ्या एकूण 57 बाधीत कुटुंबातील एका पात्र वारसास पुणे महानगरपालिकेमधील रिक्त पदावर विशेष बाब म्हणून कायम स्वरुपी नोकरी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.