पुण्यात मेट्रोच्या कामादरम्यान सापडले ५७ मीटर लांबीचे ब्रिटीशकालीन भुयार !

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यातील स्वारगेट येथे मेट्रोच्या खोदकामादरम्यान एक ब्रिटीशकालीन भुयार सापडले आहे. याठिकाणी पायलिंग मशीनने खोदकाम सुरू असताना हे जुनं भुयार आढळले आहे. हे भुयार जमिनीखाली १५ फुटांवर सापडले आहे. जवळपास ५७ मीटर लांबीचे हे भुयार असून त्याची रुंदी १.४ मीटर भुयाराची रुंदी तर ३ मीटर पर्यंत त्याची उंची आहे.

सध्या पुण्यामध्ये ठिकठिकाणी मेट्रोचे काम सुरु आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात मेट्रो कडून मल्टिट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येत आहे. त्यामुळे या ठिकाणी खोदकाम सुरु आहे. खोदकामा दरम्यान हे अद्भुत ब्रिटीश कालीन भुयार सापडल्याने सर्वत्र एकच चर्चा सुरु असून भुयार पाहण्यासाठी अनेकांची धडपड सूरु आहे.

या भुयाराचा एक मार्ग स्वारगेटवरून सारसबाग आणि पर्वती च्या दिशेने जातो तर दुसरा गुलटेकडी च्या दिशेने जातो. हे भुयार पाण्याचे वितरण करण्यासाठी हे भुयार असल्याचे म्हटले जात आहे.