वसुलीसाठी सावकाराने विष पाजले; तरुणाचा मृत्यू

बारामती तालुक्यातील सोनगाव येथील धक्कादायक प्रकार

पुणे- व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी सावकाराने एका तरुणाला विष पाजल्याची घटना बारामती तालुक्यातील सोनगाव येथे घडली. यात संबंधित तरुणाचा मृत्यू झाला. पोपट शंकर जगताप असे मृताचे नाव अाहे.
पोपटला कर्जाऊ दिलेल्या रकमेचे व्याज वसूल करण्यासाठी सावकाराचा मुलगा घरी पोपटच्या घरी अाला हाेता. त्याने पोपट जगताप यास घरातून दमदाटी करत बाहेर नेले. मात्र, बराच वेळ झाला तरी मुलगा घरी न अाल्यामुळे पोपटचे वडील शंकर जगताप यांनी पोपटचा मावसभाऊ मोहन कदम यास घेऊन त्याची शाेधाशाेध सुरू केली. त्या वेळी घरापासून काही अंतरावर सावकाराच्या घरी पोपट बेशुद्ध अवस्थेत अाढळून अाला. त्याच्या अंगावरील कपडे सावकाराच्या मुलाने काढून घेतले होते. वडिलांनी पाेपटशी बाेलण्याचा प्रयत्न केला असता सावकाराच्या मुलाने अापल्याला दारूतून विषारी काही तरी दिले, त्यामुळे मला अस्वस्थ वाटत असल्याचे पाेपटने मोहन कदम यास सांगितले. त्यानंतर काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाेपटच्या वडिलांनी संबंधित सावकार व त्याच्या मुलाविराेधात पाेलिसांत तक्रार दाखल केली अाहे. मात्र, अद्याप पाेलिसांनी संबंधित सावकाराविराेधात गुन्हा दाखल केलेला नाही. केवळ पाेपटच्या मृत्यूची नाेंद करण्यात अाली. घटनास्थळी जाऊन चाैकशी केल्यानंतर व शवविच्छेदन अहवाल अाल्यानंतरच संबंधितांवर गुन्हा दाखल हाेण्याची शक्यता अाहे.