आधीच्या सरकारच्या काळात जन्म न झालेल्या लोकांच्या नावावर सबसिडी दिली जायची -मोदी

टीम महाराष्ट्र देशा – आधीच्या सरकारच्या काळात जन्म न झालेल्या लोकांच्या नावावर सबसिडी दिली जायची ती आम्ही बंद केली आणि सबसिडी देताना जो भ्रष्टाचार व्हायचा तो बंद केल्यामुळे भ्रष्टाचारी आमच्या नाराज असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली फ़िलिपाइन्स ची राजधानी मनीला इथे भाषणादरम्यान केली.

लोकांचं भल व्हावं या उद्देशाने सबसिडी दिली जायची मात्र सबसिडी देताना भ्रष्टाचार व्हायचा. आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही सबसिडी आधार कार्ड सोबत लिंक केल्यामुळे सबसिडी देताना जो भ्रष्टाचार व्हायचा तो बंद झाला.५७ हजार करोड रुपयांची यामुळे बचत झाल्याचा दावा मोदींनी केला. ज्या उद्देशाने भारतीयांनी माझ्याकडे सत्ता सोपविली आहे तो उद्देश मी निश्चित पूर्ण करणार असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.