आम्ही हिंदूंना संघटीत करुन, अल्पसंख्यांकांच विभाजन करतो – सुब्रमण्यम स्वामी

टीम महाराष्ट्र देशा: पूर्वीच सरकार हिंदूमध्ये फुट पाडून अल्पसंख्याकांना संघटीत करायचे मात्र आम्ही हिंदूंना संघटीत करुन, अल्पसंख्यांकांमध्ये विभाजन करतो असे वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी
यांनी केले आहे. नाशिकमधील हिंदुस्थान प्रकाशन संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते

केंद्रातील मोदी सरकारने तिहेरी तलाक रद्द करण्याचा प्रयत्न केला , त्यामुळेच उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मुस्लीम महिलांनी मतदान केलं. याचा परिणाम म्हणून संख्येने जास्त असलेल्या मुस्लीम 125 पैकी 85 जागा भाजपला मिळाल्याचा दावा स्वामी यांनी केला आहे.