श्रीदेवींची हत्या तर नाही ना सुब्रमण्यम स्वामींना शंका

shridevi

टीम महाराष्ट्र देशा: दुबईमध्ये लग्नसोहळ्यासाठी गेलेल्या अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूमुळे आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सुब्रमण्यम स्वामींना यांनी श्रीदेवीची हत्या तर नाही ना अशी शंका व्यक्त केली आहे. तसेच दाऊद इब्राहिम व सिने अभिनेत्रींचे अनैतिक संबंध लक्षात घेता त्याकडे लक्ष द्यावं लागेल असं खळबळजनक विधान केलं आहे.

बाथटबमध्ये पडून श्रीदेवी यांचा मृत्यू झालाच कसा हा मुद्दा स्वामी यांनी उचलून धरल्याचे एएनआयने प्रसिद्ध केले आहे. कोणी धक्का दिल्याशिवाय त्या बाथटबमध्ये पडल्याच कशा, असा प्रश्न उपस्थित करत त्यांच्या मृत्यूच्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्वामी यांनी केली. त्याशिवाय हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजचं काय झालं, असे म्हणत स्वामी यांनी डॉक्टरांच्या अहवालावरही प्रश्न उपस्थित केला आहे.

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून श्रीदेवी यांची हत्या किंवा आत्महत्या तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित करत त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. एकीकडे त्यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली तर दुसरीकडे बाथटबमधील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे फॉरेन्सिक तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे पुन्हा एकदा नसरीन यांनी ट्विट करत श्रीदेवीच्या मृत्यूमागे षडयंत्र तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला.

Loading...