भाजपा खासदारच म्हणतात आम्ही सरकार पाडू

टीम महाराष्ट्र देशा – देशात सध्या सर्वच पातळीवर राम मंदिर बांधण्याचा वाद चांगलाच तापला आहे. त्यावरच भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने राम मंदिर उभारणीला विरोध केल्यास दोन्ही सरकार पाडू, असा इशारा दिला आहे. दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलताना सुब्रमण्यम स्वामी यांनी हा इशारा दिला आहे.

राम मंदिर उभारणीचे प्रकरण जानेवारीत न्यायालयाच्या पटलावर येणार आहे. त्यानंतर आम्ही दोन आठवड्यांत जिंकू. केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार हे दोन्ही पक्षकार आमचे विरोधक आहेत. अशी पुस्तीही सुब्रमण्यम स्वामी यांनी जोडली.

पुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार