पहिल्यांदाच मोठया पडद्यावर ‘छत्रपती शिवाजी महाराजां’च्या भूमिकेत झळकणार सुबोध भावे ..!

subhodh

मुंबई : ‘कट्यार काळजात घुसली’, आणि ‘डॉक्टर काशिनाथ घाणेकर’ चित्रपटात अविस्मरणीय भूमिका वठवून चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेला अभिनेता सुबोध भावे. अनेक चित्रपट, मालिकेतून दमदार पात्र साकारून लवकरच सुबोध छ.शिवाजी महाराजांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुबोधने यापूर्वी स्त्री पात्रांसह विविध भूमिका साकारल्या आहे. मात्र मोठ्या पडद्यावर छ.शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी पहिल्यांदाच त्याच्या वाट्याला आले आहे. त्यामुळे त्याच्यासोबत सगळे प्रेक्षक देखील त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात आणि भूमिकेत बघण्यासाठी उत्सुक आहेत. सुबोध भावेने ‘लोकमान्य एक युगपुरुष’, ‘फुगे’, ‘पुष्पक विमान’, ‘विजेता’, ‘भयभीत’ या चित्रपटात काम केले आहे.

टिव्हीवरील  ‘तुला पाहते रे’, ‘का रे दुरावा’ आणि ‘चंद्र आहे साक्षीला’ यांसारख्या मालिकांमध्ये ही काम केले आहे. आगामी प्रोजेक्टनुसार सुबोध हा दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांच्या ‘पावनखिंड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची गाथा सांगितली जाणार आहे. याच चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. प्रेक्षकांना मात्र त्याची ही भूमिका पाहण्याची चांगलीच उत्सुकता लागली आहे.

महत्वाच्या बातम्या