fbpx

सुबोध भावे करणार राहुल गांधींचा बायोपिक

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यातील महालक्ष्मी लॉन्सवर राहुल गांधींच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी मराठी अभिनेते सुबोध भावे यांनी राहुल गांधींवर बायोपिक करणार असल्याचे जाहीर केले. राहुल गांधींना बालपणी आजी व वडिलांच्या मृत्यूची घटना पाहावी लागली. एवढ्या लहान वयात दोन मोठे आघात त्यांनी पचवून एक मोठं नेतृत्व म्हणून उभे राहिले. या सगळ्यासाठी वाघाचं काळीज लागतं, असे सुबोध भावे म्हणाले.

दरम्यान, हा राजकीय स्वरूपाचा कार्यक्रम नसल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. हडपसरमधील महालक्ष्मी लॉन्सच्या हॉलबाहेर विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी होती. यावेळी उपस्थितांसाठी संगीत-नृत्य कार्यक्रमही झाले. या संवाद कार्यक्रमाला शहरातील काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी हजेर लावली. तत्पूर्वी, पुण्यातील आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे, पार्थ पवार, अमोल कोल्हे, मोहन जोशी यांनी कोरेगाव पार्कमधील हॉटेल वेस्ट इन येथे राहुल गांधींची भेट घेतली.