ते मॅनहोल महापालिका कर्मचा-यांनी उघडले नव्हते

deepak amrapurkar,

मुंबई प्रतिनिधी : डॉ . दीपक अमरापूरकर यांचा २९ ऑगस्ट रोजी ज्या मॅनहोल मध्ये पडून मृत्यू झाला त्या मॅनहोलचे झाकण महापालिका कर्मचाऱ्यांनी काढले नव्हते असा निष्कर्ष महापालिकेने नेमलेल्या चौकशी समितीने काढला आहे . सदर प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आला. सदर अहवालाची प्रत महापौरांकडे सुपूर्द करण्यात आली. हा अहवाल महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

या तीन सदस्यीय समिती मध्ये उपायुक्त (सुधार) श्री. चंद्रशेखर चोरे व संचालक(अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) श्री. विनोद चिठोरे यांचा समावेश होता. या चौकशी समितीने घटनेशी सबंधित विविध बाबींचा अभ्यास करुन व चौकशी करुन तयार केलेल्या व सादर केलेल्या अहवालातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे –

Loading...

जी / दक्षिण विभागातील पर्जन्यजल वाहिन्यांच्या कामाशी संबंधित असलेल्या कर्मचा-यांच्या निवेदनावरुन असे दिसून येते की, शंकर लक्ष्मण मटकर मार्गावरील ज्या मॅनहोल मध्ये डॉ. अमरापूरकर पडले, ते मॅनहोल महापालिका कर्मचा-यांनी उघडले नव्हते.

पोलिस खाते व शंकर लक्ष्मण मटकर मार्गावरील दुकानदारांकडून प्राप्त झालेल्या सी.सी.टि.व्ही. चित्रफीतीवरुन असा निष्कर्ष निघतो की, ४ – ६ लोकांच्या जमावाने ते मॅनहोल उघडले होते. तसेच सदर मॅनहोल बंद न करता हा जमाव जागेवरुन निघून गेला. या बाबतीत पोलीस खात्याने पुढील चौकशी व संबंधितांवर योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे.

या चौकशी समितीने आपल्या अहवालात मांडलेल्या ठळक बाबी व शिफारशी

चौकशी समितीचे असे स्पष्ट मत आहे की, मॅनहोलच्या झाकणाच्या ५ इंच ते ६ इंच खाली एक जाळीदार झाकण बसवावे, जेणेकरुन जर मॅनहोलचे झाकण उघडे राहिले तरी त्यातून पाण्याचा निचरा होईल व जीवीतहानी होणार नाही.या अहवालाच्या माध्यमातून हवामान खात्याला करण्यात आलेल्या सूचना हवामान खात्याद्वारे वर्तविण्यात येणारे अंदाज हे अनेकदा परिमाणवाचक (Quantitative) व क्षेत्र-तपशिल विरहित असतात; तसेच ते ढोबळमानाने वर्तविलेले असतात. यामुळे आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी ही अनेकदा गरजेपेक्षा खूप जास्त (over activated) किंवा कमी(under activated) केल्या जाण्याचा धोका असतो. या बाबी लक्षात घेऊन हवामान खात्याने आपले अंदाज हे अधिक ‘स्थल – काल – प्रमाण’ सापेक्ष वर्तवावेत, ज्यामुळे याबाबत आवश्यक ती आपत्ती व्यवस्थापनविषयक पूर्वतयारी योग्य प्रकारे करणे शक्य होईल. हवामान खाते हवामानाच्या अनुषंगाने जे अंदाज वर्तवते, त्यामध्ये मुंबई व कोकण यासाठी एकत्रित अंदाज वर्तवते; त्याऐवजी त्यांनी मुंबईसाठी वेगळा अंदाज वर्तवावा. मुंबईसाठी अंदाज वर्तविताना त्यामध्ये देखील मुंबईतील ठिकाणे किंवा क्षेत्र निहाय अंदाज असल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेच्या व हिताच्या दृष्टीकोनातून योग्य ती उपाययोजना करणे शक्य होईल. सदर अंदाजामध्ये पावसाचे प्रमाण, कालावधी, तीव्रता याबाबत ठिकाणनिहाय वस्तुनिष्ठ अंदाज हवामान खात्याकडून मिळाल्यास, आपत्ती व्यवस्थापन विषयक पूर्वतयारी अधिक परिणामकारकपणे करता येऊ शकेल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
रावसाहेब दानवेंचे जावई मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ