सुभाष देशमुखांचा बंगला पाडा! बच्चू कडूंचा हल्लाबोल

गरिबांना एक न्याय आणि श्रीमंतांना वेगळा न्याय का ?

सोलापूर: सहकार मंत्र्यांचा बंगला पाडेपर्यंत सोलापूर महानगरपालिकेने इतर कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. आज महापालिका आयुक्तांनी भेट घेऊन त्यांनी ही मागणी केली.

बच्चू कडू म्हणाले, गरिबांना एक न्याय आणि श्रीमंतांना वेगळा न्याय का ? असा सवाल उपस्थित करत, सुभाष देशमुखांचा बंगला पाडा मगच शहरातील अनधिकृत बांधकामावर हातोडा मारा. अस मत त्यांनी मांडले.

सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानाच्या बेकायदा बांधकाम विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली होती. आरक्षित जागेवर नियमबाह्य आणि बेकायदा बांधकाम केल्याचा ठपका सुभाष देशमुखांवर ठेवण्यात आला आहे. अग्निशमन दलासाठी आरक्षित असलेल्या जागेवर सुभाष देशमुखांनी आलिशान बंगला बांधल्याचं समोर आल आहे.