नियमांची अंमलबजाणी न करणाऱ्या लोकांना ठेचून काढणार : देशमुख

If you find guilty, the minister will leave - Subhash Deshmukh

सोलापूर : आपण शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढविली. गेल्या तीन वर्षात मी कुणाला त्रास दिला का? माझ्या घराचा विषय काढण्यात आला. मी दोषी असेल तर कोणतीही शिक्षा घ्यायला तयार आहे. मी बांगड्या घालून काम करीत नाही. नियमांची अंमलबजाणी न करणाऱ्या लोकांना आपण ठेचून काढणार आहोत असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ता समीकरण आणि एकमेकांना सत्तेपासून रोखण्यावरून राज्याच्या दोन जबाबदार मंत्र्यांमध्येच जुंपल्याने बाजार समितीच्या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुखांनी या निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल उतरवले आहे, तर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी काँग्रेसच्या पॅनेलचा आसरा घेतला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील भाजपा प्रणित श्री सिध्दरामेश्वर परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभप्रसंगी सुभाष देशमुख यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार,देशमुख म्हणाले, बाजार समित्या या शेतकऱ्यांचे शोषण करीत आहेत. नियमांची अंमलबजाणी न करणाऱ्या लोकांना आपण ठेचून काढणार आहोत. गेल्या तीन वर्षात मी कुणाला त्रास दिला का? माझ्या घराचा विषय काढण्यात आला. मी दोषी असेल तर कोणतीही शिक्षा घ्यायला तयार आहे. मी बांगड्या घालून काम करीत नाही .बाजार समित्या दलालमुक्त करणार असल्याचे सहकारमंत्र्यांनी सांगितले.