नसेल परवडत तर कांदा खावू नका, पण शेतकऱ्याला भाव मिळू द्या- सुभाष देशमुख

इंदापूर: पत्रकार कांद्याचे भाव वाढल्यावर ‘कांद्याने डोळ्यात पाणी आणल्याच’ म्हणतात, त्यामुळे परवडत नसेल तर एक वर्षभर कांदा खावू नका, पण कांदा उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळू द्या असा सल्ला देत पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकांना सुनावले आहे. इंदापूरमध्ये कांदा खरेदी केंद्राच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.

एकवर्ष भर कांदा खाल्ला नाही तर काही बिघडत नाही, जैन समाज तर कांदा खात नाही, त्यामुळे ते आर्थिक दृष्टा सुधारत आहेत. जे कांदा खाऊन रडतात त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाहीये, खिशाला परवडत नाही तर खाऊ नका, पण शेतकऱ्याला भाव मिळू द्या, भाव मिळाला तर शेतकरी आत्महत्या थांबण्यास मदत होईल, असंही ते म्हणाले.