देवेंद्र फडणवीसचं पुन्हा मुख्यमंत्री होणार; सुभाष देशमुखांनी व्यक्त केला विश्वास

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सहा दिवस उलटल्यानंतरही सत्तास्थापनेचा तिढा अजून सुटलेला नाही. भाजपला अपेक्षित जागा न मिळाल्यामुळे सत्तास्थापनेत शिवसेनेला महत्त्व प्राप्त झाले होते.

राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. ते सोलापूर आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान बोलत होते. यावेळी ते म्हणाले, शरद पवार हे सत्ता स्थापनेच्या प्रयत्नात असले तरी त्याचा कोणताही उपयोग होणार नसल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे.

Loading...

पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, ‘राज्यातील सत्तास्थापनेसाठी जो तो आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. मात्र, राज्याच्या जनतेनी महायुतीला बहुमत दिलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हा युतीचाच आणि देवेंद्र फडणवीस हेच होणार,’ असे ते म्हणाले.

दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणूक युतीमध्ये लढवलेले शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदाविषयी वाद सुरु आहे. शिवसेनाला सत्तेत अर्धा हिस्सा पाहिजे तर भाजप समसमान वाटप करण्यास तयार नाही.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'