सुभाष देशमुखांचा दिलदारपणा : १,२ नव्हे तब्बल २४ पूरग्रस्त गावं घेतली दत्तक

टीम महाराष्ट्र देशा : कृष्णा, वारणा आणि पंचगंगा या नद्यांना आलेल्या पुरामुळे बंद असलेली सांगली-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. अंकली-मिरज हा रस्ताही वाहतुकीसाठी खुला झाला आहे. पुराच्या पाण्यामुळे कोल्हापूर सांगलीचा संपर्क दहा दिवस तुटलेला होता. जयसिंगपूर – सांगली मार्गावर उदगांव येथील रेल्वे ब्रिज आणि रिलायन्स पेट्रोलपंप, दर्गा परिसर मार्गावर मोठ्या प्रमाणात पाण्याने शिरकाव केला होता. त्यामुळे या भागातील रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद होती. प्रवासी वाहतूकीसह मालगाड्या, दुधाचे टँकर, वर्तमानपत्रांच्या गाड्या, सांगलीकडे कोठून आणायच्या ? असा प्रश्न निर्माण झाला होता.

कोल्हापूरची वृत्तपत्रे सोलापूर आणि पुणे इथं छापून ती सांगलीत आणण्यात आली. कराड आणि निपाणी या दोन ठिकाणी मालवाहतुकीचे ट्रक पाण्यामुळे रस्त्यावर थांबून होते. ट्रक चालकांची जेवणाची व्यवस्था स्थानिक गावकरी माणुसकीच्या भावनेने करत होते, तर पुण्याहून बेळगांवला जाणारे लोक महामार्ग सोडून अन्य मार्गांचा शोध घेत होते.

सांगली जिल्ह्यातील 22 मार्गावर एसटी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र इतरमार्ग अद्याप बंद आहेत. दरम्यान कृष्णा आणि वारणा नद्यांना आलेल्याय पुराचा सर्वाधिक फटका सांगली जिल्ह्याला बसला. त्यामुळे सदर आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी जिल्ह्यातील 24 गांवे दत्तक घेण्यात आली आहेत अशी माहिती पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज या चार तालुक्यातील 104 गावं पूरबाधीत आहेत. सदर गावांना करमाफी मिळावी अशी लोकांची मागणी आहे.

पुराचं पाणी आता ओसरत असून नदीकाठावरील लोकांचं जीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे तातडीची मदत वाटण्याचे काम सर्व गावांतून एकाच वेळी सुरू होणार आहे. पाच हजार रुपये रोख दिल्यानंतर उर्वरित रक्कम पूरग्रस्तांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या