पिंपरी चिंचवडप्रमाणे राज्यातील घराणेशाही संपवा : सुभाष देशमुख

टीम महाराष्ट्र देशा : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पिंपरी चिंचवड येथे बोलताना ‘सर्वसामान्यांच्या जोरावर पिंपरी-चिंचवडमध्ये घराणेशाही संपविण्यात यश आले आहे. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह राज्यातील घराणेशाही संपवा’ अस आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केले.

सुभाष देशमुख यांनी यावेळी बोलताना पुण्याच्या शहरी भागामध्ये पक्ष संघटनेला गती आहे. परंतु, ग्रामीण भागात पक्षाचे काम कमकुवत असल्याचे दिसते. ग्रामीण भागात पक्ष वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावयाचे आहेत. काही झाले तरी ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघावर कमळ फुलविणे हे आपले ध्येय आहे अस विधान केले आहे.

subhash deshmukh

तसेच ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकींमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळविली. त्याच प्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला नेस्तानाबूत करून राज्यात युतीचे सरकार आणण्यासाठी सर्वांनी तयारीला लागावे, असंही देशमुख पुढे बोलताना म्हणाले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. आघाडीतील बरेच नेते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजप सेनेची युती अधिकच मजबूत होताना दिसत आहे.

शरद पवारांना अजून एक धक्का, राष्ट्रवादीचा ‘हा’ संस्थापक सदस्य करणार भाजपमध्ये प्रवेश

ग्रामीण भागाला डिजिटल साक्षर बनवणारे ‘माय नुक्कड’ अभियान