fbpx

ज्याचे खासदार चार ते पंतप्रधानपदाचे स्वप्न बघणार , सुभाषबापूंचा पवारांना टोला

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात चर्चेत असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संजय शिंदे आणि भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर यांच्या कांटे की टक्कर होत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील तुल्यबळ नेत्यांनी आपली सगळी शक्ती या जागेसाठी पणाला लावली असताना. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

२००९ ला आमच्यासाठी मतांचा देखील दुष्काळ होता. येथील जनतेने मला नाकारले पण विधानसभेला मी जिंकलो आणि आता राज्यात मंत्री आहे. इथल्या लोकांच मात्र वाटोळ झालं. माढ्याच्या जनतेने मोठ्या साहेबाला निवडणून दिलं, पवार साहेब निवडून आले की पंतप्रधान होणार आणि आमचा कायापालट होणार अशी जनतेची भाबडी आशा होती. ज्यांचे चार खासदार ते देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहणार. अरे काय चाललंय ? असा घणाघात सुभाष देशमुख यांनी शरद पवारांवर केला आहे.

दरम्यान, २००९ साली प्रचंड दगडांचा वर्षाव आमच्यावर झाला. आज फुलांचा वर्षाव होत आहे, त्यामुळे बरं वाटतंय. अस देशमुख पंढपूर मधील वाडी कुरोली येथे झालेल्या जाहीर सभेत म्हणाले आहेत. २०१४ साली मोदी लाट पाहून पवारांनी निवडणूक लढवली नाही. विजयदादांना पुढे करत दादाचं खच्चीकरण करण्यासाठी उभं केलं असाव अशी शंका येते. निवडून येण्याची खात्री असती तर ते स्वतः उभे राहिले असते. असा टोला देशमुख यांनी लगावला आहे.

डुप्लीकेट राजकारण शिकावं ते पवारांकडूनच प्रभाकर देशमुखांना माढ्यात सोडून विजयदादा आणि त्यांच्यामध्ये भांडणे लावली. तर कार्यकर्त्यांना सांगितल की हे दोघे पण ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. कार्यकर्ते काय तुमच्या मनात आहे तेच म्हणतो म्हणाले आता तुम्हीच उभा राहा. पण इथल्या लोकांच्या मनात काय होत माहित नाही ते इथ आले की, माढा आणि पवारांना पाडा सोशल मिडीयावर फिरले. शरद पवारांनी माघार घेणे हा भाजपचा पहिला विजय आहे. अस सुभाष देशमुख म्हणाले आहेत.