fbpx

कार्यकर्त्यांनी उतार वयात शरद पवारांना धावपळ करायला लवू नये – देशमुख

subhash deshmukh

सोलापूर: पवार साहेबांना कार्यकर्त्यांनी आग्रह केल्याने ते माढ्यातून उमेदवारी दाखल करू शकतात, मात्र त्यांचे वय झाले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी उतार वयात शरद पवार यांना धावपळ करायला लवू नये, असा खोचक सल्ला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे.

सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या शक्तीकेंद्र प्रमुखांचा मेळावा काल पंढरपूर येथे पार पडला. यानंतर बोलताना सुभाष देशमुख यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधतानाच पक्ष सांगेल तेथून निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं सांगितले. रद पवार हे माढ्यातून उभे राहीले तरी कमळ चिन्ह चिन्हावर आमचा उमेदवार नक्कीच त्यांना कडवी लढत देईल, असा दावा देशमुख यांनी केला आहे.

दरम्यान, मला  खासदार विजयसिंह मोहिते पाटील तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मी लोकसभा निवडणूक लढवावी अशी विनंती केली आहे. यावर आता निवडणूक लढण्याबाबत मी विचार करून ठरवेल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. पवार यांच्या या विधानामुळे ते माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आणखीनच प्रबळ झाली आहे.

1 Comment

Click here to post a comment