शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढवावी,सहकारमंत्र्यांची उपरोधिक मागणी

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीतून राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माघार घेतली असून नवीन दमाच्या उमेदवारांना संधी देण्यासाठी मी माघार घेत आहे असे स्पष्टीकरण पवार यांनी दिले. तर यावर भाजपचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी पवारांना उपरोधिक टोला लगावला आहे.

देशमुख म्हणाले की , ‘शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढवावी. ते प्रचंड मताधिक्क्यानं निवडून येतील. माझ्याकडे सोलापूर आणि माढा या मतदारसंघांची जबाबदारी आहे. मला पक्ष जी जबाबदारी देईल ती मी निभावेल,’ अशी उपरोधिक प्रतिक्रिया सुभाष देशमुखांनी दिली आहे.

तर आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेवून शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून माघार घेत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पवार यांनी काही दिवसांपूर्वीच माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याच घोषित केल होत पण एकाच घरातले सर्वच उमेदवार नको त्यामुळे मी माघार घेत आहे अस शरद पवारांनी जाहीर केलं आहे.