विरोधकांनीही घेतला मुख्यमंत्र्यांकडील चहाचा आस्वाद – सुभाष देशमुख

सांगली: आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांसाठी चहापान करणे हि आपली संस्कृती आहे. मात्र विरोधकांनी याला घोटाळ्याचे नाव देण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र त्यांनीही मुख्यमंत्र्यांकडील चहाचा आस्वाद घेतला घेतल्याच विसरू नये असा खोचक टोला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी लगावला आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मंत्रालयातील अजब-गजब उंदरी घोटाळयाच प्रकरण ताजे असतानाच, मुख्यमंत्री कार्यालयात चहा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीवरून हा घोटाळा समोर आल्याच बोलल जात आहे. दरम्यान, कधी उंदीर घोटाळा तर कधी चहा घोटाळ्याचा आरोप करत विरोधकांकडून भुई थोपटण्याचा प्रकार केला जात असल्याची टीका सुभाष देशमुख यांनी यावेळी केली, मुख्यमंत्र्यांना भेटायला देश-विदेशातील लोक येत असतात अशावेळी चहा, नाष्टा दिला जातो, मात्र विरोधकांना आता संस्कृतीचेही भान राहिलेले नसल्याच यावेळी ते म्हणाले.