राजकारणातील सुसंकृत नेता : निवडणुकीनंतर सुभाष देशमुख सर्वपक्षीयांच्या भेटीला

सोलापुर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघाचे पुनश्च निवडून आलेले आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात उभे सर्वपक्षीय उमेदवारांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.

रविवारी सुभाष देशमुख हे कॉंग्रेसचे बाबा मिस्त्री, युवराज राठोड आदिंना तसेच उद्योजक व अन्य पक्षाचे विविध नेते शिवशरण पाटील, रतीकांत पाटील, श्रीशैल हत्तूरे, जी. के. देशमुख यांना देखील सदिच्छा भेटी दिल्या.

Loading...

विरोधक आणि पक्ष हे निवडणुकीपुर्तेच मर्यादित असतात. याची प्रचिती यानिमित्ताने सुभाष देशमुख यांनी दाखवून दिली. यापूर्वी देखील कॉंग्रेस नेते, माजी मंत्री स्व. आनंदराव देवकते हयात असताना यांच्यासोबतचे त्यांचे आदरयुक्त जवळीक सर्वांनी अनुभवले आहे.

त्यांच्या मृत्यूनंतर कार्याचा आणि विचारांचा वारसा जपण्यासाठी देवकतेंच्या स्मारकासाठी सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. नुकतेच देशमुखांच्या भेटीस आलेल्या शिवदारे समर्थकांना देखील देशमुख यांनी शिक्षण महर्षी कै. शिवदारे यांच्या स्मारकासाठी सकारात्मकता दर्शवली आहे. बहुआयामी व्यक्तिमत्व असल्याने सुभाष देशमुख यांनी हे वेगळेपण कायम जपले आहे.

भेटीप्रसंगी सुभाष देशमुख यांचे सर्वांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या, तर बापूंनी पुस्तक भेट देऊन नेत्य‍ांप्रती सदिच्छा व्यक्त केली. पुढील ५ वर्षाच्या कांर्यकाळात मतदारसंघाच्या विकासासाठी काही मोलाच्या सूचना असल्यास जरूर द्या, जनतेच्या, गरजवंतांच्या कल्याणासाठी सर्वांच्या सूचनांचे स्वागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच विविध विषयावर चर्चा करून निरोप घेतले.

प्रसंगी भाजप जिल्हध्यक्ष शहाजी पवार, तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, मोईन इनामदार, सचिन चव्हाण, दैदिप्य वडापुरकर, अमर पाटील, वैभव ह्त्तूरे, मोहसीन शेख, श्ब्बीर शेख आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी