अनधिकृतरित्या बंगला बांधून सुभाष देशमुख झोपा काढत आहेत- अजित पवार

सरकार काम तर करत नाही पण लोकांना बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाही

टेंभुर्णी: सरकारने पश्चिम महाराष्ट्राचे सर्वात मोठे नुकसान केले आहे. तसेच अग्निशामक दलासाठी जी जागा राखीव ठेवली होती. तिथे अनधिकृतरित्या बंगला बांधून सहकारमंत्री सुभाष देशमुख आता झोपा काढत आहेत. त्यांनी या जिल्ह्याचे वाटोळे केले. अशी, टीका अजित पवार यांनी हल्लाबोल यात्रेदरम्यान केली. हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा सध्या पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे.

अजित पवार म्हणाले, सरकारने सर्वात मोठे नुकसान पश्चिम महाराष्ट्राचे केले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळायला हव्यात याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. तसेच राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे तरच त्यांना अमानुष कृत्य करण्यापूर्वी भीती वाटेल. आणि गुन्हेगारीला आळा बसेल. हे सरकार काम तर करत नाही पण लोकांना बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाही. पोलिस, अधिकारी सर्वच या सरकारला हैराण झाले आहेत.

You might also like
Comments
Loading...